आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉचमनने बेशुद्ध पडण्याचे सोंग केल्याने दोन दरोडेखोर गजाआड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डोक्यावरटॉमीचा वार करून पाचही जणांनी लाथा-बुक्क्यांचा वर्षाव करताच वॉचमन अंजुम शेख यांना डोळ्यासमोर मृत्यू दिसू लागला. तशाही िस्थतीत मालकाच्या संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी आपलीच आहे, याचे त्यांना भान होते. त्यामुळे त्यांनी मारहाणीत बेशुद्ध पडल्याचे सोंग केले. त्यांना निपचित पडल्याचे वाटून पाचही दरोडेखोर बंगल्यात शिरले. ही संधी साधून शेख यांंनी मालकाच्या बंगल्याशेजारील हॉटेलात धाव घेतली. तेथून पोलिसांशी संपर्क साधला. गस्तीवर असलेले पोलिस पथक तत्काळ धावून आले. त्यांनी बंगल्याला घेराबंदी केली. तेव्हा दरोडेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला चढवला. त्यात जखमी होऊनही पोलिसांनी धैर्य दाखवत प्रत्युत्तर दिले. बुधवारी (दहा डिसेंबर) पहाटे उस्मानपुरा भागात हा थरार घडला.
उस्मानपुरा येथील अॅडमरील सुट या हॉटेललगत (गोपाल कल्चरल हॉलच्या मागील बाजूस) शांतीलाल शहा यांचा रामकुंज बंगला आहे. ते दोन महिन्यापू्र्वी बंगल्याच्या संरक्षणाची जवाबदारी त्यांनी वॉचमन शेख यांच्याकडे सोपवून दुबईला त्यांच्या मुलीकडे गेले. बुधवारी पहाटे चारच्या दरम्यान शेख पहारा देत असतांना तोंडावर काळी फडकी बांधलेली पाच दरोडेखोर त्यांच्यासमोर आले. त्यातील एका मजबूत बांध्याच्या दरोडेखोराने त्यांच्या डोक्यावर टॉमीने जोरदार वॉर केला.
इसकाहो गया काम तमाम : त्यांच्याशीप्रतिकार करणे शक्य नाही असे लक्षात येताच शेख यांनी जमिनीवर अंग टाकत श्वास रोखून धरला. इसका हो गया काम तमाम असे म्हणत दरोडेखोरांनी शेख यांना लाथा घातल्या आणि ते शहा यांच्या सुनसान बंगल्यात घुसले. किलकिल्या डोळ्यांनी त्यांचा अंदाज घेत शेख झटकन उभे ठाकले. बंगल्यालगतच्या हॉटेलात त्यांनी धाव घेतली. रिसेप्शनवरील फोनवरून १०० नंबरवर पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल केला.
वॉचमन अंजुम शेख यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. चार वर्षापूर्वी रस्ता रुंदीकरण मोहीमेत त्यांचे फुलेनगरातील घर पाडले गेले. नवीन घर घेण्यासाठी गेल्या चार वर्षापासून ते शहा यांच्याकडे वॉचमन म्हणून काम करतात. दिवसभर प्लंबर आणि रात्री बंगल्याची सुरक्षा असे करून ते कुटुंबाचे पालनपोषण करतात.
पोलिस जखमी
उस्मानपुरापोलिस ठाण्याचे बीट मार्शल सहायक फौजदार बद्रीनाथ घोंगडे, काकासाहेब कुबेर, जमादार लोभाजी सुक्रे, वजरोद्दीन सय्यद, के. बी.भादवे, गोपाळ पुरबे, शहाजी निर्मळ, महंमद अनिस, पोपट पोळ, संजय नरवडे, प्रदीप ससाणे, जावेद पठाण यांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला. स्नेहनगरनजिकच्या झाडीतून दरोडेखोरांनी केलेल्या दगडफेकीत कुबेर जखमी झाले तर लोखंडी टॉमीच्या वाराने घोंगडेंचे डोके फुटले. दुचाकीवरून पाठलाग करताना बीट मार्शल लोभाजी सुक्रे दुचाकी एका घराच्या भिंतीला धडकली. त्यात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ते बेशुद्ध पडले.
पाठलाग सुरू
अनपेक्षितघडलेल्या प्रकाराने पोलिसही चकित झाले. त्यांनी स्वत:ला सावरेपर्यंत दरोडेखोर गोपाल कल्चरल हॉलपर्यंत पोहोचले होते. तेव्हा पोलिसांनीही पाठलाग सुरू केला. एसएसी बोर्ड कार्यालयाजवळ एकजण ताब्यात आला. दोघेजण स्नेहनगरलगतच्या झाडीमध्ये शिरला. तर एकजण एसएससी बोर्डच्या मागील बाजूस पळाला. पप्पु उर्फ सुरजसिंग कल्याणी गुरुसुखसिंग कल्याणी (दोघेही राहणार, मुरलीधरनगर) या दोघांना पोलिसांनी पकडले असून तीनजण फरार झाले.
पोलिस तत्काळ दाखल
घटनेचेगांभीर्य लक्षात घेऊन िनयंत्रण कक्षातून वेगवान हालचाली झाल्या. उस्मानपुरा बीट मार्शलनी घटनास्थळी पोहोचावे, असा निरोप देण्यात आला. त्यापाठोपाठ गस्ती पथकालाही अलर्टचा कॉल गेला. पाचच मिनिटांत पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी बंगल्याभोवती वेढा घातला. आपल्याला पोलिसांनी घेरल्याचे कळताच त्यांनी बंगल्याच्या संरक्षक भिंतीवरून काही क्षणात रस्त्यावर उड्या मारल्या पोलिसांवर हल्ला करत ते पळत सुटले.