आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोर्‍या-घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याने जयभवानीनगरमध्ये कडकडीत बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जयभवानीनगरमध्ये गत 27 दिवसांत पाच वेळा चोरट्यांनी घरे फोडली आहेत. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांना याबाबत माहिती देऊनही उपयोग होत नसल्याने शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच शंभर ते दीडशे नागरिकांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी निवेदन सादर केले.

जयभवानीनगरमध्ये चोरीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. मात्र, चोरांना पकडण्यात पोलिसांना यश येत नाही. त्यामुळे नागरिक व महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बंदोबस्त कसा करायचा याबाबत नागरिकांनी बैठक घेऊन व्यूहरचना आखली आहे, अशी माहिती विजय काकडे व नगरसेवक बालाजी मुंडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.