आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भामट्याने घातला ६७ हजारांना गंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्टेटबँक, यूएस बँकेतून बोलत असून आपले एटीएम ब्लॉक झाले, अशी फोनवरून थाप मारून भामट्याने जिल्हा परिषदेतील लिपिकाला गंडा घातला. भामट्याने खात्यातून ६७ हजारांची रक्कम काढली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता.१४) गुन्ह्याची नोंद झाली.

मनीष बाळकृष्ण मानवतकर (रा. श्रीनगर, उल्कानगरी) हे जिल्हा परिषदेत लिपिकपदी आहेत. जालना येथे खासगी कार्यक्रमासाठी ते कुटुंबीयांसोबत गेले. शुक्रवारी (ता. दहा) त्यांना स्टेट बँकेतून बोलत असल्याची थाप मारून एटीएम ब्लॉक झाल्याचे सांगितले. त्यानंतर परत दुसऱ्यांदा फोन करून यूएस बँकेतून बोलतो. खात्याची माहिती द्या, असे मानवतकर यांना सांगितले. यावर विश्‍वास बसल्याने मानवतकर यांनी भामट्याला खात्याची माहिती दिली. यानंतर भामट्याने मानवतकर यांच्या खात्यातून त्याच दिवशी चार वेळा पैसे काढले; परंतु पैसे डेबिट झाल्याचा एकही एसएमएस मानवतकर यांना प्राप्त झाला नाही. त्यामुळे ते गाफील राहिले.

हीच संधी साधून भामट्याने परत सोमवारी मानवतकर यांना फोन केला. मात्र, शंका आल्याने बँकेत धाव घेतली. त्या वेळीही भामट्याने फोन केला, तेव्हा मानवतकर यांनी फोन व्यवस्थापकाकडे सुपूर्द केला. मात्र, भामट्याने फोन बंद केला.