आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोलनाक्याच्या दरोड्यातील आरोपी पोलिसांना सापडेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाळूजलगतच्या जुन्या शिवराई टोलनाक्यावर ८ दरोडेखोरांनी पिस्टल व तलवारीचा धाक दाखवून सुमारे चार लाख रुपये लंपास केल्याची घटना 23 सप्टेंबर 2013 रोजी पहाटे पावणे पाचच्या सुमारास घडली होती. या दरोडेखोरांचा पोलिसांनी केलेल्या पाठलागामुळे त्यांनी लासूर स्टेशन रस्त्यात तवेरा कार सोडून देत अंधारातून पळ काढला होता. आता या घटनेला दहा महिने उलटले आहेत. अनेक पुरावे मिळूनही पोलिसांना अद्याप दरोडेखारांचा ठावठिकाणा लागलेला नाही.
दरोडेखोरांनी रोख चार लाख रुपयांच्या रोकडसह सीसीटीव्ही कॅमेरा, ऑपरेटिंग डीव्हीआर बॉक्स घेऊन तवेरा कारमधून पळ क ाढला होता. 20 ते 30 वर्षे वयोगटातील आठही दरोडेखोरांनी स्वत:ची ओळख लपविण्याची पुरेपूर काळजी घेतली. ते तवेरा क ारमधून नगर-औरंगाबाद महामार्ग सोडून लिंबेजळगावपासून वळण घेऊन तुर्काबादकडे गेले. पोलिस त्यांचा पाठलाग करीत लासूर नाक्यावर पोहोचले. दरोडेखोर कार सोडून लगतच्या पिकातून पसार झाले होते. दरोडेखोरांनी वापरलेली कार (एमएच 05 एबी 7544), आत सापडलेली एक लाख 43 हजार 386 रुपयांची रोकड, तलवार व तिजोरी फोडण्यासाठी वापरलेला मोठा हातोडा व सीसी टीव्हीचा डीव्हीआर प्लेअर आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले होते. अनेक पुरावे मिळूनही दरोडेखोर सापडले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

5 दिवसांपूर्वी फोडले शोरूम
औरंगाबाद मार्गावरील शोरूम फोडून चोरट्यांनी विविध कंपन्यांचे ट्रक, टेंपो व दुचाकीचे मिळून सुमारे 20 टायर चोरून नेले. त्याची किंमत जवळपास दोन लाख 90 हजार ६00 रुपये आहेत. ही घटना शनिवारी (7 जून) रात्री घडली. त्यासाठी, चोरट्यांनी पिकअप् व्हॅनचा वापर केला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. यातील कोणतेही धागेदोरे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. यासह परिसरातील लहान-मोठ्या चोरींच्या घटना सुरूच आहेत. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.