आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हडकोतील शिवाजीनगरात दीड लाखाची घरफोडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- हडकोतील शिवाजीनगरात दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीत दीड लाखाचे दागिने लांबवण्यात आले. ही घटना गुरुवारी सकाळी आठ ते दुपारी अडीचच्या सुमारास घडली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हडको एन-९ मधील रहिवासी दुर्गेश पोपट जोशी गुरुवारी सकाळी सिडको एन-८ मध्ये भावाला भेटण्यासाठी गेले होते. दुपारी परत आले तेव्हा घराचे कुलूप तुटलेले दिसले. चोरट्यांनी कपाटाचे कुलूप तोडून पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल राजपूत आणि सहका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. ओळखीच्याच व्यक्तीने चोरी केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र पवार तपास करत आहेत.