आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेतील उद्योगांना ४५० रोबोटचे बळ; निर्यातही वाढली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वाळूजसह शेंद्रा एमआयडीसी, रेल्वेस्टेशन भागातील उद्योगांत गेल्या पाच वर्षांत झीरो डिफेक्ट उत्पादनासाठी रोबोटचा वापर वाढला आहे. या कंपन्यांतील साठ टक्के उत्पादनांत रोबोटचा वाटा असून लघुउद्योगांतही त्याचा वापर वाढत आहे. तिन्ही उद्योग वसाहतींना सुमारे ४५० रोबोटचे बळ मिळत आहे.
औरंगाबादच्या उद्योग क्षेत्राची महती जगभरात पोहोचत आहे. झीरो डिफेक्ट उत्पादनाची कास उद्योजकांनी धरली असून यासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. शहरात आजमितीला हजार ५०० उद्योग आहेत.वाळूजची ऑटो हब म्हणून कीर्तिमान झाले असताना आता शेंद्रा अन् एमआयडीसी रेल्वेस्टेशन भागातील काही उद्योगांनी रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे उत्पादने घेऊन जगभरात शहराचे नाव मोठे केले आहे. शहरातील बड्या कंपन्यांसह बहुराष्ट्रीय कंपन्यांना सुटे भाग लागतात. मग त्यात टियर वन ते टियर थ्री असे प्रकार आहेत. मोठ्या कंपन्यांना टियर वन ते थ्रीपर्यंतची उत्पादने घेत आहेत. या कंपन्यांची निर्यातही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

स्थानिक उद्योजकांची भरारी
व्हेरॉक, बडवे इंजिनिअरिंग, लक्ष्मी ऑटो, ऋचा इंजिनिअरिंग, मेटलमॅन, यशश्री ऑटो, ग्राइंड मास्टर, टूलटेक टुलिंग्ज या स्थानिक कंपन्यांनी रोबोटिक तंत्रज्ञान वापरात आघाडी घेतली आहे. हाच ट्रेंड लघुउद्योजकांतही रुजला आहे.

रोबोट काय काम करतात?
सध्या जपान, जर्मनी कोरिया या देशांची रोबोट निर्मितीत मक्तेदारी आहे. परंतु यापुढे भारतातच रोबोटचे उत्पादन होईल, असा विश्वास उद्याेजकांना आहे.

पुण्याची मक्तेदारी संपवली
रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून काही कामे करायची असतील तर पाच वर्षांपूर्वी पुणे येथे उद्योजकांना जावे लागत होते. जपान जर्मनीच्या रोबोट कंपन्यांनी तेथे केंद्र सुरू केले होते.परंतु हळूहळू औरंगाबाद शहरातील उद्योजकांनी रोबोट विकत घेण्यास सुरुवात केली.

रोबोटला चोवीस तास काम
पूर्वी वेल्डरच वेल्डिंगची कामे करीत असे. पण अधिक परिश्रमामुळे त्याच्याकडून चुका व्हायच्या. तेच काम आता रोबोटला फक्त प्रोग्राम दिला तर तो थकता चुकता चोवीस तास अव्याहत करतो. -सुनीलकिर्दक, उपाध्यक्ष मसिआ

त्रुटीच नाहीत
रोबोटमुळे शंंभर टक्के क्वालिटी, शंभर टक्के रिपिटॅबिलिटी आाणि झीरो डिफेक्ट प्रोडक्ट तयार होते. एकदा ट्रेनिंग घेऊन अकुशल कामगारही रोबोट हाताळू शकतो. यासाठी ऑटोक्लस्टरमध्ये रोबोटिक प्रशिक्षण सुरू आहे. यात कामगार, विद्यार्थी प्रशिक्षण घेऊ शकतात. -भरतगंगाखेडकर, सीईओ, ऑटोक्लस्टर,वाळूज

बातम्या आणखी आहेत...