आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'रॉक बँड फ्यूजन' स्पर्धेत प्रेक्षकही थिरकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सळसळता उत्साह, उंच भरारीचे स्वप्न बाळगून काहीतरी करून दाखवण्याच्या ओढीने तरुण स्पर्धक रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद युवक महोत्सवात बेफाम होऊन नाचले. सकाळपासून सुरू झालेल्या शेवटच्या सत्रामध्ये प्रत्येक स्पर्धक स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता. महोत्सवाचा समारोप तन्वी पालव या छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीच्या हस्ते पारितोषिक वितरणाने झाला.

सकाळच्या पहिल्या सत्रात "रोटरी इलाइट'ची अंतिम फेरी पडली. यात स्पर्धकांच्या कलागुणांचा कस लागला. विविध गाणी, नृत्य, वैचारिक जाण तसेच सामान्य ज्ञान या स्पर्धेत तपासले गेले. गाण्याच्या स्पर्धेत शुभम कुलकर्णी याने प्रथम क्रमांक पटकवला. फोटोग्राफी स्पर्धेत मयूरसिंग राजपूत विजेता ठरला. ग्रुप डान्स प्रकारात युनिव्हर्सल ग्रुपने विजेतेपद पटकावले.
यंदा प्रथमच स्पर्धेमध्ये रॉक बँड फ्यूजन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शहरातील चार संघांनी यामध्ये सहभाग नोंदवला. प्रथमच झालेल्या या स्पर्धेत प्रत्येक गाण्याला तरुणांचा हात उंचावून आणि शिट्ट्या वाजवून उदंड प्रतिसाद मिळाला. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी सतीश लोणीकर, अमित वैद्य, अश्विन भालेकर, अनंत बर्वे आणि दीपक पवार यांनी सहकार्य आणि मार्गदर्शन केले.
मिस्टर आणि मिस इलाइट
तीन दिवसांच्या या महोत्सवात सर्वांचे लक्ष लागले होते ते मिस्टर आणि मिस इलाइट स्पर्धेकडे. अनेक प्रकारच्या परीक्षा पार करून हा किताब मिळवण्यासाठी स्पर्धक चुरशीची लढत देतात. यामध्ये मोहित बोरलकर हा मिस्टर इलाइट तर राधिका फाटके हिने मिस इलाइटचा किताब पटकावला.
रॉक बँडचे आकर्षण
तरुणाईला भुरळ घालणारे ग्लोबल संगीत ऐकवण्यासोबतच वाजवण्यातही ते कमी नाहीत. जबरदस्त फ्यूजन वाजवताना बॉलीवूड आणि पाश्चात्त्य संगीताची जुगलबंदी दाद मिळवून गेली. पाच-सहा जणांच्या या संघांनी धमाल उडवली