आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाड्याच्या खोल्या रिकाम्या!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- वाळूज एमआयडीसीतील कारखान्यांमध्ये काम करणारे बहुतांश कामगार बजाजनगरात वास्तव्यास आहेत. एरवी भाड्याने खोली मिळवण्याकरिता कामगार महिनाभर अगोदरच शोधकार्य सुरू करतात. मात्र, सध्या अनेक कंत्राटी कामगार कुटुंबीयांसह दिवाळीनिमित्त गावी गेले आहेत. अनेकांनी खोल्या रिकाम्या केल्या आहेत. त्यामुळे परिसरात ‘रूम भाड्याने देणे आहेत’ असे फलक झळकत आहेत.

एमआयडीसी परिसरातील इतर नागरी वसाहतींच्या तुलनेत बजाजनगरात सर्वाधिक एमआयडीसी व सिडको प्रशासनाच्या सुविधा मिळतात. त्यामुळे कारखान्यात काम करण्यासाठी आलेल्या कामगारांकडून कुटुंबीयांसह राहण्यासाठी प्रथम बजाजनगरला पसंती दिली जाते. एखादी खोली रिकामी होणार हे कळताच ती आपल्याला कशी मिळेल, यासाठी कामगार प्रयत्न करतात. बजाजनगरात चांगल्या शाळा, महाविद्यालये आहेत. तसेच बँक, रुग्णालये, बाजारपेठेसह अभ्यासिका, शिकवणी वर्गांचीही सुविधा असल्यामुळे कामगारांचा बजाजनगरकडे अधिक कल आहे.

परप्रांतीय कामगारांची दिवाळी : वाळूज एमआयडीसीमध्ये महाराष्ट्रसह देशभरातून कामगार कामाच्या शोधात वाळूजला येतात. परप्रांतीय कामगारांना चार-आठ दिवसांकरिता गावी जाणे शक्य होत नाही. ते दिवाळीनिमित्त एकदाच वर्षातून दोन ते तीन महिन्यांकरिता कुटुंबीयांसह गावी जातात. जाताना ते खोली रिकामी करतात. त्यामुळे परिसरात दिवाळीत अनेक खोल्या रिकाम्या होतात. मात्र, पुन्हा दोन-तीन महिन्यांत कामगार वाळूजला परततात. त्या वेळी रूमचा तुटवडा असतो.