आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rose Come From Bangalore,Indore, Mumbai, Pune For Velentine Day

व्हॅलेंटाइन डेसाठी बंगळुरू, इंदूर, मुंबई, पुण्याचे गुलाब आले!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - व्हॅलेंटाइन डे च्या पार्श्वभूमीवर यंदा गुलाब चार पटीने महागला आहे. शहरातील फूल विक्रेत्यांनी बंगळुरू, इंदौर, पुणे, अहमदनगर या शहरांतून विविध रंगांची फुले मागवली आहेत. पूर्वी एका गुलाबाच्या फुलासाठी दहा रुपये लागत होते. आता 20 रुपये मोजावे लागणार आहेत. व्हॅलेंटाइन डेच्या गुलाबी सप्ताहाला सात फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. त्यामुळे फूल, फुलमाळ आणि बुके खरेदीला वेग आला आहे. शहरातील फुलबाजारात खरेदीसाठी युवकांची गर्दी होत आहे. विक्रेत्यांनी फुलांच्या किमतीत दुपटीने वाढ केली आहे.


फुलांचे विविध प्रकार व किमती
फुलांचे नाव फुलांची किंमत
अँन्थोरियम 70 रुपयांत 10 फुले
ऑर्किड 500 रुपये, दहा फुलांचा दस्ता
लिलियम 500 रुपयांत 10 फुलांचा दस्ता
कर्नेशन 150 रुपयांत 10 फुलांचा दस्ता
गुलाब 20 रुपये
गलंडा 30 रुपये किलो.
निशिगंध 3 रुपयाला एक फूल
काकडा फूल 300 ते 400 किलो
जरबेरा 10 फुलांचा दस्ता 30 ते 50 रु
अष्टर 15 फुलांची गड्डी 30 ते 40


चारपटीने मागणी वाढली
लग्न समारंभास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी व्हॅलेंटाइन डे आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत रोज बंगळरू, मुंबई, पुणे, अहमदनगर, शिर्डी, नांदेड आदी ठिकाणावरून विविध प्रकारची फुले, आर्टिफिशियल फुले व बुके विक्रीसाठी आले आहेत. फुलांचा सुगंध महागला असल्याची माहिती विक्रेते बाबासाहेब तांबे व बंडू गवंडर यांनी दिली.