आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रस्तावित जागेवरच होणार मुंडेंचे स्मारक, हरिभाऊ बागडेंनी ठणकावून सांगितले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भाजपचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकावरुन सध्या बराच वाद सुरु आहे. एमआयएमने या स्मारकाला विरोध केला आहे. याच्या जागी रुग्णालय उभारावे, अशी भूमिका एसआयएमने घेतले आहे. दरम्यान, नियोजित जागेवरच गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्यात येईल, अशी कणखर भूमिका विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घेतली आहे.
यासंदर्भात हरिभाऊ बागडे म्हणाले, की एमआयएमने या स्मारकाला विरोध केला आहे. त्यांचा विरोध आम्ही समजू शकतो. पण स्मारक नियोजित स्थळीच उभारले जाईल. रुग्णालयासाठी दुसरी पर्यायी जागा दिली जाईल. स्मारकाचे राजकारण करु नये ऐवढेच मला सांगायचे आहे.
जालना रोडवरील दूध डेअरीच्या जागेवर गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आहे. या जागेवर रुग्णालय उभे करावे आणि त्यात गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा उभारावा, असे एमआयएमने म्हटले आहे. यासाठी मुंडे कुटुंबीयांशी चर्चा करणार असल्याचे एमआयएमचे आमदार इम्पियाज जलील यांनी सांगितले होते.
हरिभाऊ बागडे यांनी ठणकावून सांगितल्याने या वादावर पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण एमआयएमही काही गप्प बसणार नाही. भाजप-सेना युतीच्या योजनांना विरोध करण्याचा धडाका एमआयएमने लावला आहे.