आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजाबाग एन्काउंटरचा बदला घेण्यासाठी शाहिद औरंगाबादेत २५ दिवस बॉम्ब घेऊन फिरत होता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : तीनमहिन्यांपूर्वी परभणी येथील इसिसच्या संपर्कात असलेल्या चार जणांना एटीएसने अटक केली होती. यातील एका संशयित आरोपीच्या घरातून बॉम्ब जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात ८५ दिवसांच्या तपासानंतर एटीएसकडून न्यायालयात साडेतीन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या दोषारोपपत्रात एटीएसकडून अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला. २५ मे २०१६ नंतर तब्बल २५ दिवस मोहंमद शाहिद खान हा औरंगाबादेत बॉम्ब घेऊन फिरत असल्याचे तपासात पुढे आले आहे. २०१२ मध्ये रोजाबाग येथे केलेल्या एन्काउंटरचा बदला घेण्यासाठी औरंगाबाद एटीएसचे तत्कालीन प्रमुख नवीनचंद्र रेड्डी यांच्या मागावर असल्याचेही तपासात नमूद करण्यात आले आहे.

८५ दिवसांच्या तपासानंतर साडेतीन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल
११ जुलै २०१६ रोजी परभणी येथील ग्रँड कार्नर येथून पहिला संशयित आरोपी नासेर अबुबकर याफई चाऊस (३१ ) याला अटक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ २२ दिवसांत मोहंमद शाहिद खान (२८), इक्बाल अहमद कबीर अहमद (२८) आणि हिंगोलीतील शिक्षक मोहंमद रइसोद्दीन सिद्दीक (३८) यांना अटक करण्यात आली. या चौघांच्या चौकशीनंतर अनेक बाबींचा खुलास झाला. त्याचा दोषारोपपत्रात उल्लेख करण्यात आला आहे. हे तरुण इसिसच्या संपर्कात कसे आले, बॉम्ब कसा तयार करण्यात आला, नेमका त्यांचा कट काय होता, याबाबत सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे.

असा आला इसिसशी संपर्क
नासेरहा परभणीत कंत्राटदार होता, त्याने बी.कॉम.चे शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर तो व्यवसायातच लक्ष घालत होता. दरम्यान, इंटरनेटवरील दहशतवादी आणि इसिसला पाठिंबा देणाऱ्या वेबसाइटच्या तो संपर्कात आला. परभणी येथील एका मैदानावर हे चारही मित्र एकत्र येत होते. सिरियात मुस्लिमांवर अन्याय होतो आहे. त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपण सिरियात जावे असे त्यांना वाटत असताना संपर्कात असलेल्या फारुक नावाच्या व्यक्तीने भारतातदेखील मुस्लिमांवर अत्याचार होत असून तुम्ही तुमच्याच देशात काम करा असे सांगण्यात आले. बगदादी हाच आमचा खलिफा असल्याचे आम्ही मानतो, असे त्यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

असा झाला पहिला ट्रॅप
परभणीतीलएक तरुण जाळ्यात अडकला असून इतर तरुणांनादेखील तो इसिसच्या संपर्कात आणण्याचा प्रयत्न करतो आहे, अशी माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीवरून त्याच्यावर काही दिवस एटीएसने नजर ठेवली त्याला ११ जुलै रोजी चौकशीसाठी ताब्यात घेतले. तेव्हा तो सिरियातील फारुक नावाच्या एका व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे समोर आले. फारुक नावाच्या व्यक्तीशी चॅट करण्यासाठी व्हाॅट्सअॅप, हाइक, अशा चॅटिंग अॅपचा त्याने आधार घेतला असून वेगवेगळे २० अकाउंट तयार केल्याचे समोर आले. नासेर याच्या चौकशीतून शाहिद इतर दोघांची नावे समोर आली.

रोजाबाग एन्काउंटरचा बदला
२०१२ साली औरंगाबादेत एटीएसने केलेल्या एन्काउंटरमध्ये एक अतिरेकी मारला गेला होता. त्याचा बदला घेण्याचे या चौघांनी ठरवले होते. तत्कालीन एटीएस प्रमुख नवीनचंद्र रेड्डी यांनी ही कारवाई केली असून हेच या चौघांचे टार्गेट असल्याचे त्यांनी कबूल केले असून दोषारोपपत्रात तसा उल्लेख करण्यात आला आहे. एटीएसने केलेल्या तपासात हे पुढे आले आहे.

असा तयार केला बॉम्ब
बॉम्बतयार करण्यात प्रामुख्याने नासेर शाहिदचा सहभाग होता. त्यासाठी लागणारे साहित्य त्यांना शाहिदने आणून दिले होते. बॉम्ब कसा बनवायचा याची माहिती त्यांनी इंटरनेटवरून डाऊनलोड केली. परभणीतील बाजारातून यासाठी सामान खरेदी करण्यात आले. विविध प्रकारच्या रासायनिक पावडर एकत्र करून गन पावडर तयार करण्यात आली होती. रिमोटसर्किट यंत्रणेचा वापर यात करण्यात आला होताे. हा बॉम्ब घातक असून यामुळे खूप मोठे नुकसान होऊ शकते. डस्टबिनसारख्या एका प्लास्टिक कंटेनरमध्ये हा बॉम्ब होता, असा अहवाल दोषारोपपत्रात जोडण्यात आला आहे.

आपली मुले काय करतात हे घरी माहिती नव्हते
नासेर, शाहिद, इक्बाल आणि रइसोद्दीन या चारही जणांच्या घरी ते इसिसच्या संपर्कात असल्याचे माहिती नव्हते. कुटुंबीयांना अंधारात ठेवून हा सारा प्रकार सुरू असल्याचे तपासात पुढे आले आहे. कुटुंबीयांना साक्षी ठेवून एटीएसच्या अधिकाऱ्यांनी या चौघांची चौकशी केली. ज्या वेळी या चौघांनी आपण केलेले कृत्य कबूल केले तेव्हा कुटुंबीयांनादेखील आश्चर्य वाटले. कारवाई करतानाचे चित्रीकरणदेखील एटीएसकडून करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

इक्बाल रडला
याचारही आरोपींची एटीएसच्या अधिकाऱ्यांनी तब्बल एक महिना चौकशी केली. ज्या वेळी यातील एका संशयिताला घर झडतीसाठी परभणी येथे नेण्यात आले होते, तेव्हा तुला किती मारले आहे, हातापायांची नखं काढली का, असे नातेवाईक विचारत होते. मात्र तसा कुठलाही प्रकार झाला नव्हता. अधिकारी जे जेवण करत होते तेच या चारही आरोपींना मिळत होते. असे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. शी माहिती परभणीतील प्रत्यक्षदर्शींनी दिली. ज्या वेळी इक्बालला न्यायालयीन कोठडीसाठी तुरुंगात पाठवण्यात आले, त्या वेळी तो रडायला लागला. तुरुंगातील वातावरण पाहून पीसीआर बरा होता, असे तो काही कैद्यांना म्हणाला. या वेळी इक्बालच्या डोळ्यात अश्रू आल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

सिरिया शीकेला पत्रव्यवहार
नासेरयाला इसिसमध्ये भरती करणाऱ्या व्यक्तीचे नाव फारुक असे असल्याचे एटीएसच्या तपासात पुढे आले आहे. तो सिरियातून नासेरशी चॅट करत होता, असे तपासात पुढे आल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे. हा फारुक कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी सिरिया सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे कळते. आतापर्यंत देशभरातून इसिसच्या संपर्कात असलेल्या अनेक तरुणांना एनआयए किंवा एटीएसकडून ताब्यात घेण्यात आले. मात्र कुठल्याही कारवाईत जिवंत स्फोटके सापडली नव्हती. या कारवाईत मात्र स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. यापुढे नांदेड येथील विशेष न्यायालयासमोर या खटल्याची सुनावणी होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...