आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RPI Candidates Contest On Bow Lotus Elections Symbol

रिपाइं (ए) उमेदवारांना ‘धनुष्यबाण-कमळ’ निशाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रिपाइंने (ए) महायुती करत भाजप-शिवसेनेकडे काही जागांची मागणी केली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांनी सहा जागा दिल्या पण रिपाइंच्या उमेदवारांना भाजप-सेनेच्या अधिकृत निवडणूक चिन्हावर लढावे लागणार आहे. रिपाइं शहराध्यक्ष किशोर थोरात यांनी मात्र समर्थनगरातून उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडाचे निशाण फडकावले असून खासदार पुत्र ऋषिकेश खैरे यांना आव्हान दिले.

युतीचे जागावाटप झाल्यानंतर त्यांनी रिपाइंसोबत चर्चा केली. शिवसेनेने चार तर भाजपने दोन जागा सोडल्या, मात्र सर्व उमेदवार युतीच्या निवडणूक चिन्हावरच निवडणूका लढतील अशी अट घालण्यात आली. रिपाइंच्या नेत्यांनी व उमेदवारांनी अट मान्य केली. त्याप्रमाणे वॉर्ड क्रमांक १७, नंदनवन कॉलनी या अनुसूचित जातीसाठी (महिला) राखीव असलेल्या वॉर्डातून सुनील मगरे यांची पत्नी चारुलता मगरे यांना सेनेची अधिकृत उमेदवारी दिली. कोकणवाडी येथून रिपाइं कार्यकर्ते प्रकाश गायकवाड यांची पत्नी मंगला गायकवाड यांनाही धनुष्यबाण चिन्हावर लढावे लागत आहे. भाजपच्या कोट्यातून रिपाइंचे दिवंगत नेते प्रीतमकुमार शेगावकर यांचे चिरंजीव प्रशांत शेगावकर, तर प्रियदर्शिनी इंदिरानगर येथून रंजना ढेपे यांनी सेनेचे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह स्वीकारले आहे. शोभा बालाजी सूर्यवंशी यांनीही एकनाथनगर, म्हाडा कॉलनी येथून धनुष्यबाण चिन्हावर लढवत आहेत. दरम्यान सर्वानुमते हा निर्णय झाल्याचे रिपाइंचे शहराध्यक्ष किशोर थोरात यांनी सांगितले.

स्वाभिमानी बाणा
कोतवालपूरा, गरमपाणी वॉर्ड ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित असून हा मतदारसंघ देखील युतीने रिपाइंसाठी (ए) सोडला आहे. रिपाइंच्या निलाबाई पाखरे यांनी मात्र, धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. लक्ष्मी कॉलनीतील रहिवासी पाखरे या स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. येथे शिवसेनेचा उमेदवार नसेल.