आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिपब्लिकन पक्षांच्या एेक्याचा प्रयोग सुरू, पहिला प्रयोग चालला तीन तास ४० मिनिटे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आपसातील सर्व गट-तट विसरून एकत्र येण्यासाठी रिपब्लिकन चळवळीतील दुसऱ्या पिढीतील नेत्यांनी आजपासून बैठकांचा सिलसिला सुरू केला. यासाठी पहिला प्रयोग डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात शुक्रवारी तास ४० मिनिटे चालला. यात सर्व गटातटाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. येत्या २२ तारखेला मुंबई मंत्रालयावर अत्याचाराविरोधात मोर्चा काढण्यात येणार असून यात शक्तिप्रदर्शन करून आपली ताकद दाखवावी, असे या वेळी ठरले.
दुपारी वाजता सुरू झालेली ही बैठक सायंकाळी सात वाजून ४० मिनिटांनी संपली. यात सामान्य कार्यकर्त्यांनीही आपली मते मांडली. ताकद दाखवण्याची ही एक चांगली संधी असल्याचे कार्यकर्ते म्हणाले. फक्त नेतृत्वावरून वाद होणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला देण्यात आला. मुंबईचे मनोज संसारे, शहरातील आजी-माजी नगरसेवकांमध्ये कैलास गायकवाड, संजय जगताप, कृष्णा बनकर, मिलिंद दाभाडे, अरुण बोर्डे, आर. के. गायकवाड, चेतन कांबळे, भीमसेन कांबळे, रमेश जायभाय, रूपचंद वाघमारे, शकुंतला धांडे आदी सहभागी झाले होते.
"एका छत्राखाली या'
सध्यावेगवेगळ्या पक्षांत असलेल्या कार्यकर्त्यांना तरुणांचे नेतृत्व भविष्यात कोण करेन याचा विचार करता एका झेंड्याखाली यावे. नेतृत्वाच्या मुद्द्याला गौण स्थान असावे. येत्या काळात राज्यात सर्वत्र परिसंवाद तसेच अन्य वैचारिक कार्यक्रम घेऊन कार्यकर्त्यांमध्ये जागृती करावी, असे ठरल्याचे सांगण्यात आले. या मेळाव्याचा कोणी वैयक्तिक आयोजक नव्हता. २२ जुलैचा मोर्चा रिपब्लिकन चळवळीच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा ठरावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. त्यानंतर पुन्हा बैठक बोलावून पुढील निर्णय घेतला जाईल, असे या वेळी ठरले. मोर्चा यशस्वी झाल्यानंतर नव्याने सुरुवात करू असे सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...