आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षात चोरले लाख रुपये, तीन महिलांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाहतूक शाखा पोलिसांचे अभिनंदन करताना पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी आणि हेमंत कदम. - Divya Marathi
वाहतूक शाखा पोलिसांचे अभिनंदन करताना पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी आणि हेमंत कदम.
औरंगाबाद - ऑटो रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाच्या बॅगेतील एक लाख रुपये चोरणाऱ्या तीन महिलांना वाहतूक शाखा पोलिसांनी पकडले. तिघींविरुद्ध एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हाडा कॉलनीतील संध्या सोनवणे भावजयीसोबत आकाशवाणीजवळील कॉर्पोरेशन बँकेत गेल्या होत्या. तेथून लाखाची रक्कम काढून त्या अॅपेरिक्षाने घराकडे निघाल्या. या रिक्षात नीलम्मा पद्मशाली, राधा पद्मशाली आणि सुजाता पद्मशाली (सर्व रा. शिवाजीनगर, मंठा) या तिघी जणी बसल्या. रिक्षात जास्त प्रवासी असल्याने एपीआय कॉर्नरवर वाहतूक शाखेतील सहायक फौजदार हिवराळे, काॅन्स्टेबल डोंबाळे, नलावडे, चव्हाण यांनी अॅपेरिक्षा अडवली. या वेळी वाहतूक शाखा पोलिसांना तिघींवर संशय आला. त्यांनी तेथेच संध्या सोनवणे यांना आपली काही वस्तू चोरीला गेली का, अशी विचारणा केली. संध्या यांनी बॅग तपासली असता त्यात लाख रुपये नव्हते. त्यामुळे पोलिसांनी तिघींची विचारपूस केली असता त्यांनी पैसे चोरल्याचे कबूल केले.