आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rs 2145 Crore In State Excise Revenues, Against The Target Of Rs 3041 Crore,

विक्रीकर वसुलीत औरंगाबादला बसला ५०० कोटी रु.चा फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुष्काळ व मंदीमुळे औरंगाबाद विभागात विक्रीकर वसुलीला ५०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. स्टील, ऑटोमोबाइलसह शेती उद्योगांना मोठा तोटा झाल्याचा परिणाम थेट विक्रीकरावर झाला अाहे. विभागाच्या ३०४१ कोटींच्या उद्दिष्टापैकी फेब्रुवारीपर्यंत २,१२५ कोटींची करवसुली झाली आहे. गतवर्षी याच काळात ही ती २६२५ कोटी होती. औरंगाबाद विभागात जालना, बीड, औरंगाबादचा समावेश आहे. जालन्याचे ५०% स्टील उद्योग बंद झाल्याने २७० कोटी रुपयांचा विक्रीकर बुडाला.
सोने चकाकले : जागतिक सराफा बाजारातील सकारात्मक संकेत, देशातील ज्वेलर्स व रिटेलर्सकडून चांगली मागणी यामुळे सोने तेजीने चकाकले. दिल्लीत सोने २१५ रुपयांनी वाढून २८,८००, तर औरंगाबादेत २९,१०० रुपयांवर पोहोचले. हा सोन्याचा दीड वर्षातील उच्चांक आहे.

सेन्सेक्स ८०७ अंकांनी पडला : बँकांचा एनपीएचा बोजा, जागतिक अर्थव्यवस्थेवरील मळभ यामुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचा गुरुवारी धडाका लावला. शेअर बाजारात एका दिवसातील आठवी सर्वात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ८०७.०७ अंकांनी घसरून २२९५१.८३ वर आला.