आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगावर घाण टाकून तीन लाख पळवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - खासगी बस चालकाच्या अंगावर घाण टाकून दोन भामट्यांनी तीन लाख रुपयांची बॅग घेऊन पळ काढल्याची घटना गुरुवारी दुपारी सिडकोतील कॅनॉट परिसरात घडली. विशेष म्हणजे या दोन भामट्यांपैकी एक अल्पवयीन आहे. विडनाथ लिंगप्पा स्वामी (३२, रा. शिवाजीनगर, मूळ रा. लातूर) असे या खासगी बस चालकाचे नाव आहे. औरंगाबाद-माजलगाव मिनी बसवर चालक असणारे विडनाथ स्वामी गुरुवारी सिडको बसस्थानकाजवळ मिनी बस घेऊन आले होते.
दरम्यान, कॅनॉट परिसरात असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून त्यांनी तीन लाख रुपये काढले. सदरील रक्कम त्यांनी आपल्या गाडीतील चालक सीटच्या बाजूला ठेवली. त्यांच्यासोबत आणखी दोन बसचालक होते. त्यांची बस आरटीओने जप्त केल्याने तेही स्वामीसह बसस्थानकाजवळ थांबले होते. या वेळी दोन भामटे त्यांच्याजवळ आले आणि त्यातील एकाने त्यांच्या अंगावर घाण टाकली. अंगावर पडलेली घाण साफ करत असतानाच अचानक त्या भामट्याने गाडीमध्ये असलेली तीन लाख रुपयांची बॅग पळवली. स्वामी आपले कपडे बदलून आले असता त्यांना पैशांची बॅग गायब असल्याचे आढळले. त्या भामट्यांनीच आपली बॅग पळवल्याचे लक्षात येताच त्यांनी सिडको पोलिस ठाणे गाठत दोघांविरुद्ध तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त सुखदेव चौगुले, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
कपडे बदलण्यासाठी गेले अन्
अंगावरघाण टाकल्याने स्वामी बसच्या मागे शर्ट बदलण्यासाठी गेले. त्यांनी आपल्या एका सहकाऱ्याला बसमधून शर्ट आणण्यासाठी पाठवले. शर्ट बदलण्यासाठी स्वामी गेल्याचे बघून भामट्यांनी बॅग पळवून नेली.