आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरे कत्तलीसाठी नेणाऱ्यांना ५० रु दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: लोडिंग रिक्षा आणि मेटॅडोरमधून गाय-बैलांना अवैधरीत्या कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या तिघांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मनीषा बी. कुलकर्णी यांनी दोषी ठरवून प्रत्येकी ५० रुपये दंड ठोठावला.

क्रांती चौक ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दशरथ चौधरी, पोलिस शिपाई धीरज काबलिया हे १४ फेब्रुवारी २००६ रोजी सायंकाळी सात वाजता गस्त घालत असताना सावरकर चौकातून लोडिंग रिक्षा (एम.एच. २० डब्ल्यू ७५४२) आणि मेटॅडोर (एम.एच. २० ए. ए. ८२७५) मधून गाय आणि बैल अवैधरीत्या कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. पाठलाग करून विभागीय ग्रंथालयासमोर दोन्ही वाहने अडविण्यात आली. लोडिंग रिक्षामध्ये दोन गायी आणि मेटॅडोरमध्ये गायी बैलांच्या पायांना दोरखंड बांधून नेण्यात येत होते.
सिल्लेखाना येथील शेख समीर शेख शाकीर, बडातकिया येथील इस्माईल कुरेशी आणि महंमद नफीस महंमद हफीज या तिघांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ती १० जनावरे सिल्लेखान्यात कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे लक्षात आल्यानंतर तिघांकडे जनावरांचा परवाना, वाहतुकीचा परवाना नसल्यामुळे त्या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील दहा जनावरांची कोंडवाड्यातून मुक्तता करण्यात आली.
धीरज काबलिया यांच्या तक्रारीवरून शेख समीर, इस्माईल कुरेशी आणि महंमद नफिस या तिघांविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक दशरथ चौधरी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्याची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मनीषा बी. कुलकर्णी यांच्यासमोर झाली असता त्यांनी तिघांना दोषी धरून त्यांना ११ (२) ११ एफ या कलमान्वये प्रत्येकी ५० रुपये दंड, मोटार वाहन कायदा कलम १३० (१) (३) नुसार १०० रुपये दंड ठोठावला. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. रूपाली मेतकेवार यांनी साक्षीदार तपासले.
बातम्या आणखी आहेत...