आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS Leader Indresh Kumar Commented On Gau Hatya Issue In Aurangabad

हजमध्ये गोमांस विक्री अपराध, संघाचे अ.भा. कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेशकुमार यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- हजमध्येगोमांस विक्री अपराध आहे. गोमांस विकल्यानंतर अपराध समजून कारवाई केली जाते. त्यामुळे संपूर्ण हजयात्रा परिसर गायीच्या कुर्बानीपासून मुक्त आहे. मात्र आपल्याकडे गोमांस खाण्यावरून वाद सुरू आहे. गोमांस खाणाऱ्याला देवच सद््बुद्धी देवो, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अ. भा. कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केले. ते रविवारी संघाच्या विजयादशमीनिमित्त आयोजित उत्सवप्रसंगी बोलत होते.

सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून एस.आर.इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक श्रीधर नवघरे, शहर संघचालक डॉ. उपेंद्र अष्टपुत्रे, अनिल भालेराव उपस्थित होते. या उत्सवास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात, भाजप शहराध्यक्ष बापू घडामोडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी स्वयंसेवकांनी शाखेत चालणाऱ्या खेळांचे प्रात्यक्षिक दाखवले.

गायसर्वाधिक उपयुक्त प्राणी : यावेळी इंद्रेशकुमार म्हणाले की, गायीचे दूध अमृततुल्य मानले जाते. गोमूत्रापासून आज २०३ औषधे बनवली जातात. मधुमेह, कॅन्सर यासह अनेक आजारांवर या माध्यमातून उपचार केला जात आहे.

भावना दुखावणे पापईएए
सर्वचधर्मांच्या ग्रंथांत गायीला पवित्र मानले आहे. मुस्लिम धर्मात हजची यात्रा पवित्र मानली जाते. हजमध्ये गायीची कुर्बानी दिली जात नाही. ज्या क्रियेने लोकांच्या भावना दुखावल्या जातात ते सर्वाधिक पाप मानले जाते.