आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS News In Marathi, Maharashtra Assembly Election 2014, BJP, Divya Marathi

भाजपची गोची: संघ राज्य विधानसभा निवडणुकीत बजावणार 'वॉचडॉग'ची भूमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लोकसभेत हिरीरीने सहभागी झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता राज्य विधानसभा निवडणुकीत मात्र "वॉचडॉग'ची भूमिका बजावणार आहे. उमेदवारांचा प्रत्यक्ष प्रचार संघ करणार नाही, परंतु मतदार जागृती व गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्याचे काम मात्र करणार आहे. दिल्ली आम्ही जिंकून दिली, राज्यात तुमच्या ताकदीवर लढा, असा संदेशच संघाने भाजपला दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत संघाची भूमिका महत्त्वाची ठरली. मोदी सरकारची परीक्षा म्हणून बघितल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मात्र गोष्टी सांगेन युक्तीच्या चार.. अशीच संघाची भूमिका राहील. नागपूर मुख्यालयातून तसा काही संदेश आला नसल्याचे एका वरिष्ठ स्वयंसेवकाने सांगितले.

जानेवारीत महासंगत शिबिर : औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर ११ जानेवारी २०१५ रोजी संघाचे महासंगत शिबिर होणार आहे. सरसंघचालकांसह देशभरातील संघाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

सक्रिय सहभाग नाही : रा.स्व. संघ ही राष्ट्रीय संघटना आहे. त्यामुळेच लोकसभेच्या वेळी आम्ही प्रचार केला. या वेळी मात्र तशी काही सूचना आलेली नाही. म्हणून राज्यातील निवडणुकीत संघ जागृती करील, पण प्रचारात उतरणार नाही.
- वामनराव देशपांडे, प्रचारप्रमुख, देवगिरी प्रांत