आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाच्या शिबिराला ५५ हजार स्वयंसेवक येणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ११ जानेवारीला होणाऱ्या "देवगिरी महासंगम'करिता ५५ हजार स्वयंसेवकांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती संघाचे प्रांत सहकार्यवाह हरीश कुलकर्णी यांनी पत्रपरिषदेत दिली. बीड बायपास रोडवरील श्रीराम मंदिर न्यासाच्या १०० एकरांवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी मराठवाडा आणि खान्देशातील सर्व विभागांतून स्वयंसेवक येणार आहेत.

गेल्या पंधरा वर्षांत संघाच्या कार्याचा आढावा आणि पुढील कामाची दिशा या वेळी निश्चित केली जाणार आहे. शिबिरासाठी ५५ हजार स्वयंसेवकाची नोंदणी झाली असून ६० हजारांवर स्वयंसेवक येण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरासाठी पोस्टर्स, जाहिरातबाजी, भिंती रंगवणे, पत्रके आदी प्रकार केले जाणार नाहीत.
दुपारी बाराला शिबिराची सुरुवात होऊन संध्याकाळी साडेसातपर्यंत ते चालेल. या पत्रकार परिषदेला देवगिरी प्रांत संघचालक अॅड. गंगाधर पवार, विभाग संघचालक अनिल भालेराव, बाळासाहेब चौधरी, डॉ. उपेंद्र अष्टपुत्रे यांची उपस्थिती होती.