आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाळा जागेवर नाही, कृपया कुणालाही सांगू नका, संस्थाचालकांच्या गमतीशीर उत्तराने पालक चक्रावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आरटीई प्रवेशात नवनवीन प्रकार समोर येत असून शाळा जागेवर नसल्याच्या तक्रारी पालक करीत आहेत. अधिकारी मात्र कारवाईऐवजी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. आरटीईच्या दुसऱ्या ड्रॉमध्ये नंबर आलेल्या पालकास ज्या पत्त्यावर शाळा सांगण्यात आली, तिथे बोर्ड आहे परंतु शाळाच नाही. एका खोलीसमोर लावलेल्या या बोर्डावरून पालकांनी शाळेच्या अस्तित्वाबद्दल सवाल केला असता, शाळा नाही असे कुणाला सांगू नका, असे गमतीशीर उत्तर संस्थाचालकांनी दिल्याचे समोर आले आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांना २५ टक्के मोफत प्रवेश देणे बंधनकारक असताना, राज्यभरात ५० टक्क्यांपेक्षाही कमी प्रवेश झाले आहेत. राज्यात आरटीईअंतर्गत हजार ४२९ शाळा असून त्यात ७३ हजार १२९ पालकांनी अर्ज केले आहेत. आतापर्यंत या अर्जांपैकी फक्त २६ हजार ७३३ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. अनेक शाळा प्रवेश देण्यास टाळाटाळ करतात, तर काही शाळांनी पत्ता बदलल्याने या शाळा शोधण्यात पालकांचा वेळ गेला. काही शाळा तर पैशांची मागणी करीत असल्याने आरटीई प्रवेशाचा राज्यभर बोजवारा उडाला आहे. दरम्यान, दुसऱ्या फेरीस शुक्रवारपासून प्रारंभ झाला. पहिल्याच फेरीतील अर्धे प्रवेश झालेले नसताना दुसरी फेरी सुरू झाली असून या फेरीत पालकांना ज्या शाळा प्रवेशासाठी मिळाल्या त्या जागेवर नाहीत. आता तर खुद्द संस्थाचालकच इथे शाळा चालत नाही, हे कुणाला सांगू नका असे सांगत असल्याचे एका सजग पालकामुळे समोर आले आहे.

पाल्यांच्या शिक्षणाचे काय होणार?
^पाल्याचा दुसऱ्या फेरीत प्रवेश करण्यासाठी नंदनवन कॉलनीतील लिटल बर्ड््स स्कूल मिळाल्याचा संदेश मोबाइलवर आला. त्यानुसार, प्रवेशासाठी गेलो असता एका खोलीसमोर बोर्ड लावल्याचे दिसले. मात्र तिथे शाळाच भरत नाही. उलट इथे शाळाच नाही, पण हे कुणाला सांगू नका, असे सांगण्यात आले. अशा परिस्थितीत आमच्या पाल्यांच्या शिक्षणाचे काय ? -अजित खरात, पालक

हजार १३२ प्रवेश, दुसऱ्या फेरीस सुरुवात
जिल्ह्यात आरटीईअंतर्गत ४३२ शाळा असून त्यात पहिल्या फेरीसाठी हजार १४२ विद्यार्थ्यांची ड्रॉमधून निवड झाली. आतापर्यंत हजार १३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते; ७९१ पालक शाळांना अॅप्रोच झाले नाहीत; तर ५८८ प्रवेश रिपोर्टिंगअभावी पेंडिंग आहेत. ३३ प्रवेश अर्ज रद्द करण्यात आले. शुक्रवारपासून दुसऱ्या फेरीस सुरुवात झालीे. त्यासाठी पालकांना एसएमएस सुरू झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...