आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीई प्रवेशासाठी १६ जानेवारीपासून नोंदणी; असे आहे वेळापत्रक, फेब्रुवारीपर्यंत शाळेत नोंदणी करणे अनिवार्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश देण्यासाठीची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने गेल्या वर्षीपासून सुरू आहे. मात्र तीन चार वर्षांत प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाल्याने २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात ही प्रक्रिया अधिक सुरळीत करण्यासाठी १६ जानेवारीपासूनच प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 

याही वर्षी ही प्रक्रिया ऑनलाइन राहणार आहे. शाळा नोंदणीसह संपूर्ण कार्यक्रमाचे वेळापत्रकच शासनाने जाहीर केले असून ते संकेतस्थळावरही अपलोड करण्यात आले आहे. १६ जानेवारी ते २९ एप्रिल दरम्यान आरटीई प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशासाठी पात्र असलेल्या शाळांची यादी पहिल्यांदा निश्चित करावी लागणार आहे. २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस पात्र असलेल्या सर्व शाळांनी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे बंधनकारक असणार आहे. 

{शाळा नोंदणी १६ जानेवारी-३ फेब्रुवारी 
{पालकांनी ५-२१ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन प्रवेश अर्ज भरावेत 
{पहिली सोडत २७ २८ फेब्रुवारीला. 
{पालकांनी शाळेत जाऊन ते मार्चपर्यंत प्रवेश निश्चिती करावी {शाळांनी रिक्त पदे तपासून उर्वरित जागा १०, ११ मार्चला जाहीर कराव्यात. 
{दुसरी सोडत १४ आणि १५ मार्च रोजी 
{पालकांनी शाळेत जाऊन १६ ते २१ मार्च दरम्यान प्रवेश निश्चित करावेत. 
{शाळांनी रिक्त पदे तपासून उर्वरित जागा २२, २३ मार्चपर्यंत जाहीर कराव्या. 
{तिसरी सोडत २४, २५ मार्चला होईल. 
{या फेरीतील प्रवेश २७ मार्च ते एप्रिल पर्यंत होतील. 
{त्यानंतर शाळांनी रिक्त पदे तपासून उर्वरित जागा जाहीर कराव्यात. 
{चौथी सोडत ७, एप्रिल रोजी होईल. 
{पालकांनी १० ते १५ एप्रिल दरम्यान प्रवेश निश्चित करावा. 
{पाचवी सोडत १८-२० एप्रिल दरम्यान होईल. तर २१-२७ एप्रिल पर्यंत प्रवेश निश्चित करायचे आहेत. 
{शाळांना रिक्त पदे तपासून उर्वरित जागा २८ २९ एप्रिलपर्यंत जाहीर कराव्या लागतील.