आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RTI - माहिती पुरवण्यास उशिर करणा-या अधिका-यांना १५ हजारांचा दंड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अपिलार्थीस त्याच्या माहितीच्या अर्जानुसार माहिती पुरविण्यास उशिर करणा-या जनमाहिती अधिकारी तथा नगर भुमापन अधिकारी आणि सहाय्यकांना राज्य माहिती आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आयुक्तांनी २५ हजारांचा दंड ठोठावला.
जनमाहिती अधिकारी तथा नगर भुमापन अधिकारी बन्सी गणपत बांगर यांना १५ हजार रुपये तर सहाय्यक सी.एन.कुलकर्णी आणि बी.एच.भाले यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
राज्य माहिती आयोगाकडे अरुण माडूकर यांनी जन माहिती अधिकारी तथा नगर भुमापन अधिकारी औरंगाबाद यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
राज्य माहिती आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आयुक्त दी.बा. देशपांडे यांनी या अपिलावरील सुनावणीत माहिती अधिकारी आणि त्यांच्या कर्मचा-यांना दंड का करु नये याचा खुलासा मागितला होता. मात्र त्यांच्या खुलाशात माहितीला विलंब का झाला याचे कोणतेही ठोस कारण दिलेले नव्हते. तसेच बचावात लेखी पुरावा सादर करु शकले नाही. त्यामुळे माहिती अधिकारी बांगर आणि सहाय्यक कुलकर्णी आणि भाले यांना दंड ठोठावण्यात आला आहे.
बांगर सध्या अंबड येथे भुमी अभिलेख उपअधिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
दंड करण्यात आलेली रक्कम शासकीय कोषागारात जमा होईल याची दक्षता घेण्याचे आदेश भूमी अभिलेक उपसंचालकांना देण्यात आले आहेत.
स्त्री भ्रूणहत्येची माहिती द्या अन् 25 हजार रुपये मिळवा
धुळ्यात सिव्हिल हॉस्पीटलने दडवली कुपोषितांची माहिती
तंत्रज्ञान - आता एसएमएसने मिळणार औषधांची माहिती
प्रणव मुखर्जींबद्दल सांख्यिकी संस्‍थेकडून चुकीची माहिती?