आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत एआरटीओच्या अंगावर दलालाने फेकल्या नोटा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्रादेशिक परिवहन कार्यालयात नव्याने रुजू झालेल्या अधिकार्‍याच्या अंगावर नोटा फेकून छायाचित्र काढण्यापर्यंत दलालांची मजल गेली. गुरुवारी (18 जून) घडलेल्या या प्रकारामुळे अधिकारी आणि कर्मचारी भयभीत झाले आहेत.

उस्मानाबाद येथील सहायक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण गुरुवारी औरंगाबादच्या कार्यालयात रुजू झाले. पहिल्याच दिवशी दलालांनी त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. नियमबाह्य काम करण्यास नकार दिल्यामुळे एका दलालाने खिशातून हजार रुपयांच्या नोटांचे बंडल काढले आणि दोन हजार रुपये चव्हाण यांच्या अंगावर फेकले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनीही कानावर हात ठेवले आहेत. हा प्रकार गैरसमजातून घडल्याचे मान्य करत, यापुढे असे होणार नाही, अशी ग्वाही संघटनेच्या वतीने अनिल थोरात यांनी दिली.

नेमके काय घडले : सहायक परिवहन अधिकारी अनिलकुमार बस्ते यांना निलंबित केल्यामुळे तीन दिवसांपासून कार्यालयात गोंधळ सुरू आहे. वाहनांच्या नोंदणी नूतनीकरणावरून गुरुवारी अधिकारी आणि दलालांमध्ये वाद झाला. पूर्वी झालेल्या कामाचे मला काही सांगू नका, कामे करावयाची असतील तर नव्याने रीतसर प्रक्रिया करावीच लागेल, या भूमिकेवर चव्हाण ठाम असल्यामुळे दलालाने हे नाट्य केले.