आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरटीओच्या कामाची तपासणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाजाची तपासणी करण्यासाठी पुण्याहून चार जणांचे पथक बुधवारी शहरात दाखल झाले. वाहनांची पासिंग करताना अधिकारी प्रत्यक्ष काय तपासणी करतात यांची पाहणी करून संध्याकाळी पथक परतले.


आरटीओ कार्यालयात दलालामार्फत गैरव्यवहार केला जात असल्याचा आरोप जनहित याचिकेद्वारे करण्यात आला होता. या प्रकरणाची सर्वंकष तपासणी करण्यासाठी न्यायालयाने समिती गठित केली आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये समितीला पाठवण्यात आले. सकाळी अकरा वाजता एक महिला व तीन अधिकारी आरटीओ कार्यालयात आल्यानंतर पन्नास क्रमांकाच्या खिडकीवर कागदपत्र तपासणीची पद्धत पाहिली. यानंतर या पथकाने अयोध्यानगरीतील खुल्या मैदानावर सुरू असलेल्या मोठय़ा व छोट्या चारचाकी वाहनांच्या तपासणीची पद्धत बघितली. न्यायालयाच्या सूचनेनुसार कामकाजाची पद्धत जाणून घेत आहोत, असे पथकाच्या वतीने सांगण्यात आले. अहवाल न्यायालयाकडे सुपूर्द करणार असल्याचे पथकातील सदस्यांनी सांगितले. दरम्यान, पथकाला आवश्यक ती मदत केली जात असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी सांगितले.