आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परीक्षेविषयी अफवा पसरवली, पोलिसांत तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अभियांत्रिकी विषयाच्या परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकल्याची अफवा पसरवणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात परीक्षा विभागाने पोलिसांत तक्रार दिली आहे. १४ मेपासून सुरू होणाऱ्या परीक्षा विद्यापीठाने आधीच दोन आठवडे पुढे ढकलल्या होत्या. त्यात खोडसाळपणाने बनावट परिपत्रक काढून २७ मेऐवजी दोन आठवड्यांनी परीक्षा होणार असल्याची अफवा व्हॉट्सअॅपद्वारे पसरवली गेली. ‘त्या’ व्यक्तीचा शोध घेऊन कायदेशीर कारवाईची अपेक्षा विद्यापीठाने तक्रारीत व्यक्त केली आहे.

अभियांत्रिकीच्या रिड्रेसल परीक्षेचा निकाल येण्यास थोडा विलंब झाला. त्यामुळे पदवी परीक्षा १४ ऐवजी २७ मेपासून, तर १ जूनपासून पदव्युत्तर परीक्षा घेण्यात येणार आहेत. मात्र, अचानक व्हॉट्सअॅपद्वारे बनावट परिपत्रक काढून २७ मेऐवजी पुन्हा परीक्षा दोन आठवड्यांनी लांबल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये ६ जूनपासून अभियांत्रिकीची, तर ११ जूनपासून पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा सुरू होणार असल्याची अफवा पसरवली. त्यामुळे डॉ. सरवदे यांनी कुलगुरूंशी चर्चा करून पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. डी. एम. नेटके यांच्या स्वाक्षरीने गुरुवारी (२१ मे) सकाळी पोलिस आयुक्त, सायबर गुन्हे शाखेसह बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रारीच्या तीन प्रती देण्यात आल्या आहेत. अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून बेगमपुऱ्याचे पोलिस उपनिरीक्षक रोडे तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...