आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Running Truck Take Fire Issue At Auarangabad, Divya Marathi

धावत्या ट्रकला आग; चालक बचावला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- औरंगाबाद-नगर रोडवर धावत्या ट्रकला अचानक आग लागली. चालकाने उडी घेतल्याने त्याचे प्राण बचावले. ही घटना नगर-औरंगाबाद महामार्गावर वाळूजलगतच्या टोलनाक्याजवळ शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. पोलिसांनी अग्निशमन पथकास पाचारण क रून आग आटोक्यात आणल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.
नगरकडून औरंगाबादकडे भरधाव निघालेल्या ट्रकला (एमएच 20 सीई 372) इंजिनच्या बाजूने आग लागली. हळूहळू ही आग डिझेल टँकच्या दिशेने पसरू लागली. गोंधळून गेलेल्या चालकाने प्रसंगावधान राखून ट्रकमधून खाली उडी घेतली. त्यामुळे तो बचावला. ट्रकला आग लागल्याचे कळताच वाळूज पोलिसांनी वाळूज एमआयडीसीतील अग्निशमन पथकाला पाचारण केले. ए. आर. साबळे, एस. आर. गायकवाड, आर. बी. कुरणे, ए. जे. गोसावी, एम. डी. मनोरे, आर. आर. वाघाडे यांच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली. हा ट्रक रिकामा होता. मात्र, तो पूर्णपणे जळून खाक झाला. वाळूज पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.