आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rupesh Kalantri Article About Uday Nirgudkar, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉक्टरांची डॉक्टर उदय-सुपर्णा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाटा, गोदरेज सारख्या कंपन्यांमध्ये २० वर्षे आयटी तज्ज्ञ, वक्ते म्हणजेच डॉ. उदय निरगुडकर. सध्या झी २४ तास वृत्तवाहिनीचे संपादक. ४० देशांमध्ये काम करणे असो वा पत्रकारितेतील पदार्पण. डॉक्टरांचा ‘उदय’ आणि उदयचा डॉ. उदय निरगुडकर होण्यात पत्नी डॉ. सुपर्णाच्या आधाराची मात्रा, भक्कम कणा ठरली. पत्नीचा विषय निघाला की ते भरभरून बोलतात आणि लिहितेही होतात. जोडीदाराचे सत्य आणि सार्थ वर्णन करतात, त्यांच्या भावना, त्यांच्या शब्दात...
‘वि ल इट वर्क आऊट’ तिनं आमच्या होकाराच्या आधी एकमेव भेटीच्या आधारावर मला फोनवरून विचारलं. तशी आमच्या लग्नाला फार वर्षे झालेली नाही. ९४ च्या मार्चची ही गोष्ट, तसे एकाच पण अत्यंत प्रदीर्घ भेटीनंतर आम्ही पुढच्या दोन-चार दविसांत फोनवर चिक्कार बोललो. ती तेव्हा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये डॉ. राममूर्तीच्या हाताखाली इंटेन्सिव्हिस्ट बनण्यासाठी दविस-रात्र झटत होती. ( ह्या झटण्याचं तेव्हा म्हणजे लग्नाआधी कौतुक होतं, पण नंतर मात्र त्रास झाला हे ही खरं..) तिन तेव्हा नुकतंच मुंबईच्या प्रसिद्ध मेडिकल कॉलेजमधून एम.डी.( मेडिसीन) पूर्ण केलं होतं. आमची भेट झाली ते ठिकाण म्हणजे जहांगीर आर्ट गॅलरी.. समोवर इन. तिथं दोन तास काढल्यावर जवळच्या रेस्टॉरंटमध्ये दीड तास (वे साइड इन) मग मरीन ड्राइव्हवर दोन. अर्थात त्यात मीच जास्त बोलत होतो. ती ऐकत होती, कोणतीच प्रतिक्रिया देत नव्हती. या गोष्टींचा मला तेव्हा त्रास झाला होता. आताही होतो. त्या दोन-चार दविसांत आम्ही फोनवरच जास्त बोललो. जनरलच, मात्र टाइमपास मात्र नाही.. नक्कीच नाही.

आमचे स्वभाव वेगवेगळे असण्याला कौटुंबिक पार्श्वभूमी जबाबदार आहे. माझा जन्म एका मराठी, ब्राह्मणी कुटुंबात. वडील सरकारी नोकर, आई शिक्षिका. वाचनाचा संस्कार आईने केला. वक्तृत्वाचादेखील. समाजाच्या सर्व थरातले मित्र होते. घर म्हणजे एक साहित्य, नाट्यसंमेलन असायचं, त्याकाळी. कधी संध्याकाळी नाटकाची तालीम, कधी संगीताची मैफल, कधी चार-आठ कवी; एक ना अनेक. एक प्रकारची सांस्कृतिक विविधता होती. त्यानं मला बहिर्मुख केलं. आयुष्य असंच असावं असं मला तेव्हा तीव्रतेने वाटे आणि आताही. हे सगळं थोडं विस्तारानं अशासाठी की सुपर्णा असं आयुष्य तिच्या बालपणी जगली नाही. ती वाढली तिच्या आजोबांकडे, इंदूरला. ते मोठे न्यायाधीश. भेटायचं तर वेळ ठरवून. तो आब, बंगला, सिक्युरिटी गार्ड वगैरे. बहुविधतेला अशानं माणूस मुकतो. एकीकडे त्याचं आकर्षण असतं, पण ते पेलवतही नाही. त्या एका आकर्षणातूनच तिनं मला विचारलं असावं. ‘विल इट वर्क आऊट ’अर्थात हे ती मराठीत विचारू शकली नाही, कारण ती मराठी शिकलीच नव्हती. मग कुसुमाग्रज, महानोर, सुर्वे तर ऑप्शनलच. हा पण हिंदी आणि इंग्रजी तिनं बऱ्यापैकी वाचलेलं होतं. पण तेही साधारणत: श्रीमंत घरातील करिअर फोकस्ड मुलीनं वाचावं तसं. त्यामुळे त्यात गुंतून पडणं, रमणं, ह्यातील मौज तिला कळलीच नव्हती.

कलाकाराला वरचढ डॉक्टरकी
मृत्यूच्या दाढेतून एखाद्याला लीलया बाहेर काढणं तिला (च) जमतं. त्यावेळी ती फक्त एक डॉक्टर आणि डॉक्टरच असते. कित्येकदा आमचं कुठंतरी जायचं ठरतं आणि पेशंट सिरीयस म्हणून तिला जावं लागतं. सगळ्या कार्यक्रमाचा विचका होतो. जुन्या काळातल्या मैफली आता होत नाहीत. माझी ईशा आणि पार्थ ही मुलं या आनंदाला वंचित राहतात याची खंत असते. पण त्याच वेळी ती कुणाचा तरी जीव वाचवत असते, त्या वेळी तिची एकाग्रता मोहात पाडणारी असते. त्यामुळेच की काय तिला रात्री,अपरात्री हॉस्पिटलमधून आणण्यासाठी मी आवर्जून जातो. तिच्यातल्या डॉक्टरनं तिच्यातल्या कलाकाराला संपवलं आहे. तिला उत्तम चित्रे काढता येतात. चित्रांची भाषा तिला चांगली समजते. पण आता ब्रशची जागा स्टेथॅस्कोपनं घेतली आहे. तिच्यातल्या डॉक्टरनं मात्र तिच्यातली संवेदनशीलता, माणुसकी अधिक सजग केली आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा गरीबीवर उपचार