औरंगाबाद- राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे रविवारी (नऊ नोव्हेंबर) शहरात येणार आहेत. सकाळी सात वाजता त्यांचे मुंबई येथून चिकलठाणा विमानतळावर आगमन होणार आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर त्या प्रथमच औरंगाबादेत येत आहेत. त्यामुळे त्यांचे भाजपच्या वतीने जोरदार स्वागत केले जाणार आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत त्यांच्या हस्ते मुकुंदवाडी परिसरातील रामनगरातील विठ्ठलनगरमध्ये स्वच्छता अभियानास सुरुवात होणार आहे. त्या अकरा वाजता सुभेदारी विश्रामगृहावर अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे भाजपचे प्रसिद्धीप्रमुख राम बुधवंत यांनी कळवले आहे.