आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांच्या सुट्यांनी बहरली पर्यटनस्थळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - शनिवारी स्वातंत्र्य दिन आणि रविवार अशा दोन दिवस जोडून सुट्या आल्या.त्यामुळे अजिंठा, वेरूळ लेणीत दोन दिवस पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळाली. या दोन दिवसांत लाखभर पर्यटकांनी भेटी दिल्या. त्यातच श्रावणमासालाही शनिवारपासून सुरुवात झाली. त्यामुळे लेणीसह पर्यटकांनी घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्याच्या पाहावयास मिळाल्या.

वेरूळसह अजिंठा लेणी देखील पर्यटकांनी फुलली होती. पर्यटकांच्या गर्दीमुळे परिसरातील दुकानांमध्ये मोठी उलाढाल झाल्याचे दिसून आले. पावसाने दडी मारल्याने अजिंठ्याचा धबधबा यंदा वाहिला नव्हता, परंतु गतआठवड्यात झालेल्या पावसामुळे धबधबा सुरू झाल्याने पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत होते.