आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या पाठिंब्याशिवाय सार्क परिषद अशक्य : खासदार खैरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सार्क देशांची भारतातील पहिली पर्यटन परिषद औरंगाबादेत आयोजित करण्यात आली आहे. परंतु आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या सोहळ्याच्या आयोजनाची घोषणा करण्यापूर्वी आपल्याला कल्पनाही दिल्यामुळे खासदार चंद्रकांत खैरे यांनी नाराजी व्यक्त केली. राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक खात्याच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग यांनी परस्पर ही घोषणा करून टाकली. परंतु खासदाराच्या पाठिंब्याशिवाय सार्क परिषद अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीत खासदारच याबाबतीतील वाटाघाटी करू शकतात, असा दावाही त्यांनी केला.
जुलै रोजी औरंगाबादेत झालेल्या पर्यटन परिषदेत शहरात सार्क देशांची पर्यटन परिषद आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या या सोहळ्यास सार्कच्या आठ देशांचे प्रतिनिधी तसेच भारतातील सर्व राज्यांचे पर्यटनमंत्री उपस्थित राहतील. यानंतर संसदीय समितीच्या बैठकीसाठी तिरुवनंतपुरम येथे असणारे खासदार खैरे यांच्याशी “दिव्य मराठी’ने संवाद साधला असता त्यांना याबाबत माहिती दिल्याचे स्पष्ट झाले.

काहीच माहिती नव्हती
खैरे म्हणाले, सार्क परिषदेविषयी काहीच माहिती नव्हती. पर्यटन परिषदेत मला बोलावले नव्हते. एवढी मोठी आंतरराष्ट्रीय परिषद शहरात होत असल्याचे वृत्तपत्रातील बातम्यांतून कळाले. परिषदेच्या आयोजकांनी (राज्य शासनाने) आम्हाला यात सहभागी करून घ्यायला हवे. आम्ही त्यांना सेवा देऊ. आमचा काहीच इगो नाही. वल्सा नायर सिंग यांनी आम्हाला सांगावे काय हवे ते, आम्ही त्यांना सर्व्हिस देऊ. ते म्हणतील तेथे मी बैठकीला जाईन, असे त्यांनी सांगितले. असे कार्यक्रम शहरात होणे आवश्यक आहे. यामुळे शहराचा नावलौकिक, महत्त्व वाढते. यापूर्वीही अशा परिषदेची घोषणा झाली. वृत्तपत्रांतून बातम्याही प्रकाशित झाल्या. पण परिषद काही झाली नाही. अशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी आमचा सहभाग घ्यावा. वल्सा नायर सिंग यांनी सांगितले आणि ते लोक आले असे होत नाही. दहा वेळेस सांगावे लागते. मंत्र्यांचा, सेक्रेटरींचा पाठपुरावा करावा लागतो. अधिवेशन सुरू होणार आहे. संबंधित मंत्र्यांच्या अपॉइंटमेंट घेऊन ठेवेन. खासदार केंद्रातील असल्यामुळे अशा कार्यक्रमांसाठी त्यांना बोलावले पाहिजे. खासदारच राज्य, केंद्रातील दुवा आहे. खालच्या लोकांना यातील काय कळतेय, असा सवालही त्यांनी केला.

कळवायला हवे होते
^सार्कपर्यटन परिषदेसारख्या आंतरराष्ट्रीय आयोजनांसाठी खासदाराचा पाठिंबा आवश्यक आहे. यासाठी दिल्लीतून वाटाघाटी कराव्या लागतात. दहा वेळा सांगितले तर पुढे कामे होतात. असा पाठपुरावा माझ्याशिवाय कोण करणार? प्रधान सचिवांनी चर्चा करताच ही घोषणा करून टाकली. आम्हाला निदान कळवायला हवे होते. तरी आम्ही यासाठी सहकार्य करू. -चंद्रकांत खैरे, खासदार
बातम्या आणखी आहेत...