आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात सार्क पर्यटन परिषद घेण्याची घोषणा हवेतच विरली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी या खात्याच्या प्रधान सचिवांनी महिनाभरापूर्वी शहरात सार्क देशांची पर्यटन परिषद घेण्याची घोषणा केली. मात्र, महिना उलटला तरी याबाबत केंद्र शासनाकडून एकही अौपचारिक पत्र आले नाही किंवा विचारणाही झाली नाही. यामुळे आठ देशांच्या या परिषदेबाबत संभ्रम निर्माण झाला अाहे. मात्र, प्रशासन परिषद घेण्याबाबत आशावादी असून सूचना येताच कामाला लागण्याची तयारी दर्शवली आहे.
औरंगाबाद आणि महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सार्क देशांची भारतातील पहिली पर्यटन परिषद १३ १४ ऑक्टोबर रोजी औरंगाबादेत आयोजित करण्याची घोषणा राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक खात्याच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंग यांनी केली होती. जुलै रोजी शहरात आयोजित एका पर्यटन परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. दोन दिवसांच्या परिषदेत पहिल्या दिवशी सार्क देशातील अधिकारी स्तरावर, तर दुसऱ्या दिवशी मंत्री स्तरावर चर्चा होणार असून परिषदेच्या उद््घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु घोषणेला महिना उलटला तरी पर्यटनाच्या या महाकुंभासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली झालेल्या नाहीत.

...तर कामाला लागता येईल रू आठसार्क देशांचे प्रतिनिधी येणार असल्याने यासाठी जंगी आयोजन करावे लागणार आहे. एवढ्या पाहुण्यांसाठी निवास व्यवस्था करावी लागणार आहे. सर्वात आधी शहरातील पायाभूत सुविधा सुधाराव्या लागणार असल्या तरी अद्याप कोणतीच तयारी सुरू झालेली नाही. याबाबत विभागीय आयुक्त उमाकांत दांगट म्हणाले, सार्क पर्यटन परिषदेच्या आयोजनाची सर्व जबाबदारी केंद्र शासनाची आहे. याबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या स्तरावर काम सुरू आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडे औपचारिक सूचना आलेली नाही. तशी सूचना आली तर स्थानिक पातळीवर कामाला लागता येईल, असे दांगट यांनी सांगितले. राज्याच्या प्रधान सचिवांपाठोपाठ केंद्राच्या पर्यटन खात्याचे सचिवही जुलै रोजी पाहणीसाठी येणार होते.

मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट
औरंगाबादेत सार्क देशांची पर्यटन परिषद आयोजित करणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. गतवर्षी मे महिन्यात चीन दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद आणि डुनहांग या शहरात सिस्टर सिटी करार केला होता. तेव्हापासूनच औरंगाबादेत सार्क पर्यटन परिषद घेण्यासाठी त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू केला. तेथून हिरवा कंदील मिळाला. सुरुवातीला एप्रिल किंवा मे महिन्यात परिषद घेण्याची परवानगी मागण्यात आली होती.

औपचारिक निरोप नाही
^प्रधान सचिव वल्सा नायर-सिंग यांनी गत महिन्यात औरंगाबादेत सार्क पर्यटन परिषद घेण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप याबाबत काेणताच पत्रव्यवहार झालेला नाही. आमच्याकडे सूचनाही आलेली नाही. तरी ही परिषद औरंगाबादेत व्हावी, अशी इच्छा आहे,त्यासाठी आम्ही तयार आहोत. -उमाकांत दांगट, विभागीय आयुक्त, औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...