आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बारबालांचे पुनर्वसन व्हायला हवे : सचिन खेडेकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बारमध्ये नाचणा-या मुली आणि त्यांच्यावर रोज उधळले जाणारे लाखो रुपये, हे चित्र आपण पाहतो. या गोष्टीचे मी समर्थन करीत नाही. मात्र त्यांना या व्यवसायातून बाहेर काढून त्यांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. डान्स बार ही एक स्वतंत्र दुनिया आहे. हजारो मुली आणि लाखो कामगार या व्यवसायावर पोट भरतात. त्यामुळे कुठलाही व्यवसाय बंद करताना त्यांच्या रोजीरोटीचा विचार होणे आवश्यक आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर यांनी व्यक्त केले.
"गुलाबी' चित्रपटाच्या टीमने शुक्रवारी "दिव्य मराठी' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सचिन खेडेकर यांनी या चित्रपटाच्या निर्मितीविषयी आणि आपल्या अभिनयप्रवासाविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. पोलिस अधिकारी आणि बारबालाची प्रेमकथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. काकस्पर्श, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमांतून सामान्य माणसाची भूमिका प्रेक्षकांच्या मनात ठसवणारे सचिन खेडेकर यांनी या सिनेमात पोलिस अधिका-यांची, तर भोजपुरी सिनेमातील अभिनेत्री पाखी हेगडे हिने बारबालेची भूमिका साकारली आहे. दिग्दर्शन गुड्डू धनोआ यांनी केले आहे. "सिंघम' फेम विनीत शर्मा विनय आपटे यांच्याही दमदार भूमिका आहेत. संजय चौहान यांचे कथानक असून औरंगाबादचे एम. प्रकाश यांनी गीते लिहिली आहेत.