आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोणी खुर्द - महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर खासदार झाल्यापासून राजकारणात चांगलेच स्थिर झाले आहेत. किंबहुना ते राजकारण्याप्रमाणे आश्वासनेही देऊ लागले आहेत. याचा प्रत्यय वैजापूर तालुक्यातील वाकला येथील ग्रामस्थांना आला. काही दिवसांपूर्वी सचिन यांनी रस्ता दुरुस्तीसाठी निधी देण्याचे वाकला ग्रामस्थांना आश्वासन दिले होते, परंतु अद्याप रुपयाचीही मदत केली नाही. त्यामुळे सचिनचे आश्वासन म्हणजे ‘बोलाचा भात नि बोलाची कढी’ ठरले आहे.
वाकला येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांना सात किलोमीटरचा फेरा मारून जावे लागत होते. रस्ता दुरुस्त करावा यासाठी ग्रामस्थांनी सर्व लोकप्रतिनिधींकडे साकडे घातले, परंतु त्याचा फायदा झाला नाही. अखेर ग्रामपंचायतीने ठराव घेऊन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याकडे मदतीसाठी याचना केली होती. त्यास प्रतिसाद देत सचिन यांचे सीनियर मॅनेजर अमित भानगड यांनी गावाला मदत देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच जानेवारीअखेरीस मुंबईत बैठक घेऊन जिल्हाधिकार्यांना निधीचा प्रस्ताव पाठवला जाईल, असे सांगितले होते; परंतु जानेवारी गेला, फेब्रुवारीही सरला तरी निधी न मिळाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसभेचे खासदार म्हणून सचिन तेंडुलकर यांना 10 कोटींचा विकास निधी मिळतो. या निधीपैकी एक रुपयाही त्यांनी खर्च केलेला नाही अशी माहिती वाकला येथील अण्णासाहेब वाकला यांनी दिली.
निधीचे आश्वासन
सचिन तेंडुलकर यांच्या कार्यालयाकडून वाकला गावासाठी निधी देण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे ग्रामस्थांनी आनंदोत्सव केला; परंतु पत्रव्यवहार झाला नाही याची खंत वाटते. डॉ.प्रमोद जिवरग, ग्रामस्थ.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.