आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलग चौथ्या दिवशीही सचखंड ‘लेट’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - उत्तर भारतात वीजपुरवठा खंडित होत असल्याने रेल्वे प्रशासनाला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले आहे. अमृतसरहून नांदेडला येणारी सचखंड एक्स्प्रेस सलग चौथ्या दिवशी लेट आली. मंगळवारपासून या एक्स्प्रेसला उशीर होत आहे. आज शुक्रवारीसुद्धा या गाडीला साडेचार तास उशीर झाला.

रेल्वे नांदेडहून औरंगाबाद, मनमाड, भुसावळ, भोपाळ, झांसी, आग्रा, दिल्लीमार्गे अमृतसरला जाते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून ही गाडी उशिरा धावत आहे. शुक्रवारी सचखंडमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, वीजपुरवठा खंडित झाल्याने या रेल्वेला अमृतसरहून निघण्यास उशीर होत आहे. शुक्रवारी अमृतसरहून आलेली सचखंड एक्स्प्रेस सकाळी 11.30 ऐवजी दुपारी 4 वाजता औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर आली. गुरुवारी ही रेल्वे अमृतसरहून पहाटे 04.45 ऐवजी सकाळी 8 निघाली. पुढेही प्रत्येक स्टेशनवर या रेल्वेला उशीर होत गेला. यामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. ही रेल्वे शुक्रवारी 04.30 वाजता औरंगाबाद स्थानकात आली. मनमाडहून अमृतसरपर्यंत ही रेल्वे विजेवर चालते. वीजपुरवठय़ातील अनियमिततेमुळे तिला दररोज उशीर होत असल्याचे स्टेशन मॅनेजर अशोक निकम यांनी सांगितले. सचखंड एक्स्प्रेसची औरंगाबाद स्टेशनवर येण्याची वेळ सकाळी 11.30 वाजताची आहे. मात्र, तिला गेल्या चार दिवसांपासून उशीर होत आहे. मंगळवारी ती संध्याकाळी 6 वाजता म्हणजे साडेसहा तास वाजता उशिरा आली. बुधवारी संध्या 07.30 वाजता म्हणजे आठ तास उशीर, गुरुवारी दुपारी 4 वाजता म्हणजे साडेचार तास उशीर, तर शुक्रवारी 04.15 वाजता पोहोचल्याने पावणेपाच तास उशीर झाला.