औरंगाबाद - दिल्ली-औरंगाबाद असा प्रवास करणार्या "सचखंड'च्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. दिल्ली येथून मे रोजी निघालेल्या "सचखंड'ने औरंगाबादपर्यंत येण्यासाठी अधिक थांबे घेत ३० तासांचा वेळ घेतला. रेल्वे प्रशासनाच्या या कारभारामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
औरंगाबादचे रहिवासी अनंत मोताले मे रोजी दुपारी १.३० च्या सुमारास सचखंड रेल्वेगाडीत बसले. ते सोमवारी संध्याकाळी ५.३० वाजता औरंगाबादला पोहोचले. दिल्लीवरून निघाल्यानंतर सचखंड औरंगाबादला २३ तासांमध्ये पोहोचणे अपेक्षित आहे. दिल्ली ते खंडवा तास लावले. मार्गावरील इतर गाड्यांसाठी प्रत्येक ठिकाणी सचखंड थांबवण्यात येत होती. इटारसी येथे गाडीतील पाणी संपले. डोंगरगाव येथेही गाडी पाऊण तास उभी करण्यात आली. येथे प्रवासी आणि अधिकार्यांमध्ये वाददेखील झाला. त्यांच्याकडून प्रवाशांना दाद मिळाली नाही.
अखेर भुसावळ येथे सहायक स्टेशन मास्टर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी शांततेने लेखी तक्रार करण्याची विनंती केली आणि पुढील सर्व स्टेशनवर रेल्वेगाडी जास्त वेळ न थांबवण्याचे आदेश दिले. भुसावळ येथे रेल्वेमध्ये पाणी भरून देण्यात आले.