आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज खंडित झाल्याने सचखंड 8 तास लेट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - उत्तर भारतात वीज खंडित झाल्याने अनेक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. या विजेचा फटका सचखंड रेल्वेलाही बसला असून ही गाडी सलग दुसर्‍या दिवशी उशिरा धावली. बुधवारी तिला आठ तास उशीर झाला. त्यामुळे या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून याची प्रचिती औरंगाबाद रेल्वेस्थानकावरही प्रवाशांना आली आहे. अमृतसरहून नांदेडला जाणारी सचखंड एक्स्प्रेस सलग दुसर्‍या दिवशी उशिरा धावत असल्याने औरंगाबाद स्थानकावर अनेक प्रवासी अडकून पडले. सचखंड एक्स्प्रेस मंगळवारी साडेसहा तास, तर बुधवारी आठ तास उशिराने औरंगाबाद रेल्वेस्थानकावर आली. नांदेडला जाणारी ही गाडी औरंगाबाद स्टेशनवर सकाळी 11.30 वाजता पोहोचते, परंतु उत्तर भारतात वीज ख् ांडित झाल्याने ती मंगळवारी सायंकाळी 6 वाजता, तर बुधवारी 7.30 वाजता औरंगाबादला आल्याने प्रवाशांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले. मनमाडहून ही रेल्वे अमृतसरपर्यंत विजेवर चालते. मात्र, वीजपुरवठा खंडित होत असल्याने तिला उशीर होत असल्याचे स्थानक व्यवस्थापक अशोक निकम यांनी सांगितले. गुरुवारी सचखंड एक्स्प्रेस वेळेवर येण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.