आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sadasiv Gaike News In Marathi, Congress, Divya Marathi, Lok Sabha Election

गायकेंची उमेदवारी नितीन पाटलांच्या पथ्यावर?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंरगाबाद - काँग्रेस बंडखोर तथा माजी जिल्हाध्यक्ष अँड. सदाशिव गायके यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसला फटका बसणार नाही, तर उलट ती पथ्यावर पडेल, असा काँग्रेसमधील राजकीय तज्ज्ञांचा कयास आहे. त्यामागील त्यांचा तर्कर्ही त्यांनी पुढे केला आहे. त्यामुळे गायके मैदानात राहिल्याचा फायदा पाटील यांनाच होणार, असा दावा करण्यात येत आहे.
असा आहे तर्क : काँग्रेसच्या सूत्रांनी म्हटल्यानुसार गायके यांना मिळणारी मते काँग्रेसचीच असणार हे पक्के नाही. काँग्रेसचे नाराज मतदार गायके यांना मतदान करतील हे खरे असले तरी ते काँग्रेसला मतदान करणार नाहीत; पण गायके मैदानात नसते तर कदाचित ही मते शिवसेनेकडे गेली असती. गायकेंमुळे ही मते सेनेकडे जाणार नाहीत. परिणामी याचा फायदा आपोआपच काँग्रेसला होईल. त्याचप्रमाणे गायकेंना समाजवादी पक्षाची मते मिळतील. काही मुस्लिम तसेच मराठा मतदानही त्यांच्याकडे जाईल. ही सर्व मते काँग्रेसला मिळणारी नव्हती. मात्र, ती सेनेकडेही जाणार नाहीत. त्यामुळे यात काँग्रेसचा फायदा असल्याचा दावा केला जात आहे.
मुस्लिमांची एकगठ्ठा मते 100 टक्के काँग्रेसला मिळणार नाहीत. काही जण नाराज आहेत. अशी मते गायके यांच्याकडे जातील. तसाच प्रकार मराठा मतांच्या बाबतीत होईल. सर्व मराठा मते पाटील यांच्याकडे जाणार नाहीत. त्यांच्यावर नाराज असलेल्या मराठा मतदारांची मते खैरेंकडे जाण्याऐवजी ती गायके यांच्या पारड्यात जातील. परिणामी शिवसेनेची मते कमी होतील, असाही युक्तिवाद केला जात असून गायके यांची उमेदवारी काँग्रेससाठी चांगलीच असल्याचे प्रचारादरम्यान सांगितले जात आहे.