आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खऱ्या अर्थाने उभे राहतेय ‘साधूंचे ग्राम‘

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गुरुपौर्णिमेचासण साजरा करून प्रत्येक आखाड्याचे प्रमुख महंत, श्री महंत, महामंडलेश्वर, जगद‌्गुरू आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये परतायला लागतील. त्यापूर्वी त्यांचे ‘वाॅटरप्रूफ’ मंडप तयार करण्याच्या कामांना मंडपवाल्यांनी वेग दिला असल्याने आता खऱ्या अर्थाने ‘साधूंचे ग्राम’ उभारण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असल्याचे दिसून येत आहे.

तपोवनात प्रशासनाच्या वतीने साधुग्रामसाठी प्राथमिक सोयीसुविधांची उभारणी करण्याचे काम जवळपास पूर्णत्वाला पोहोचले आहे. त्यात रस्ते, वीज, पाणी, स्नानगृह आणि शौचालय यांचा समावेश आहे. परंतु, त्या व्यतिरिक्त प्रशासनाने मोकळ्या ठेवलेल्या जागेमध्ये आपापल्या आखाड्यांचे, खालशांचे तंबू, मंडप, शामियाने उभारण्याचे काम त्या - त्या आखाडे, खालशांकडून केले जाते. त्यानुसार आपले श्रीमहंत नाशकातून मुक्काम हलवून मूळ गावी रवाना झाल्याने संबंधित सर्व प्रमुख आखाडे आणि खालशांनी मंडप कंत्राटदारांकडून साधुग्राममध्ये मंडपांच्या उभारणीला वेग दिला आहे.

दोन्ही जगद‌्गुरूंचे सर्वात भव्य मंडप
जगद‌्गुरूनरेंद्र महाराज यांचा शामियाना जनार्दन स्वामी आश्रमाच्या अलीकडे, तर दुसरे जगद‌्गुरू हंसदेवाचार्य महाराज यांचा शामियाना जनार्दन स्वामी मंदिराच्या समोरील भागात आहे. या दोन्ही ठिकाणी, तर सर्वात मोठ्या विस्तृत जागेवर मंडप उभारणी सुरू आहे. या मंडपांमध्ये भक्तांची सर्वाधिक गर्दी राहण्याचा अंदाज असल्याने त्यांना प्रशासनाच्या वतीने सर्वात मोठ्या जागा औरंगाबाद रोडवरच दिल्या आहेत.

महत्त्वाच्या काही महंत, जगद‌्गुरूंसाठी एसी मंडप
तपोवनातसाधुग्राममध्ये अत्यंत महत्त्वाच्या काही महंत, श्रीमहंत, जगद‌्गुरूंसाठी एसी मंडपदेखील उभारले जाणार आहेत. मात्र, त्या कामांना आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रारंभ केला जाणार असल्याचे एका मंडप कंत्राटदाराने यावेळी सांगितले. हे मंडप केवळ त्या मान्यवरांच्या मुक्कामस्थानापुरतेच राहणार असल्याचेही मंडप कंत्राटदाराने नमूद केले.

खालशांचे पत्र्यांचे मंडप
उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणामधूनदेखील खालसे त्यांचे सामान ट्रकमधून आणून दाखल झाले आहेत. त्यात बहुतांश खालशांनी तर आपापल्या मंडपासाठीचे पत्रेदेखील सोबत आणले आहेत. पत्रे, लाकडी बल्ल्या, बांबू , दोरखंड, कापड असे सर्व साहित्य घेऊनच ते दाखल झाले आहेत. काहींनी मंडप उभारणीला प्रारंभ केला आहे, तर काहींनी सामान आणून आपापल्या जागेवर ठेवले असून, मंडप उभारणाऱ्यांची शोधाशोध सुरू आहे.

पारंपरिक कंत्राटदार
प्रत्येक कुंभमेळ्याच्या ठिकाणी तंबू उभारण्यासाठी बहुतांश आखाडे आणि खालशांचे पारंपरिक कंत्राटदार असतात. तेच चारही कुंभमेळ्यांच्या ठिकाणी संबंधितांना उपलब्ध जागेत आवश्यक तसे मंडप उभे करून देतात. तर, काही खालशांनी कायमस्वरूपीच पत्रे, बल्ल्या विकत घेतल्या असून, त्या खालशांच्या जागांवरून कुंभस्थानी आणून तिथे मंडप उभारतात. या सामानाची केवळ ने - आण करण्यासाठी प्रत्येकी किमान ५० ते ७० हजार भाडे लागत असल्याचेही खालशांमधील साधूंनी सांगितले.

१० - हजार भाविकांची मंडपात प्रवचनासाठी बसण्याची सोय
०२ - एकर जागा दोन्ही जगद‌्गुरूंच्या शामियान्यासाठी देण्यात आली.