आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सफारी पार्कच्या डीपीआरसाठी मनपाने मागवले इरादापत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिकेच्या वतीने मिटमिटा येथील शंभर एकर जागेवर सफारी पार्क विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचा डीपीआर (संपूर्ण विकास आराखडा) तयार करण्यासाठी ज्यांना प्राणिसंग्रहालय उभारण्याचा अनुभव आहे, अशा इच्छुक आर्किटेक्ट आर्किटेक्ट संस्था, कंपन्यांनी सहभागी होण्यासाठी शनिवारी इरादापत्र जाहीर केले आहे.
सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांसाठी सध्याची जागा अपुरी पडत असल्याने राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने पाच वर्षांपूर्वी येथून प्राणिसंग्रहालय अन्यत्र हलवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मनपाने शहराजवळील मिटमिटा येथील गट नंबर ३०७ मध्ये शासनाच्या शंभर एकर जागेची मागणी केली होती. त्याचा ठराव ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. तसा प्रस्तावही शासनाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करण्यात आला. शासनाने नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच ही जागा मनपाला सफारी पार्कसाठी उपलब्ध करुन दिली. जागा विकसित करत असताना त्यावर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार असून कोणत्याही वेळी त्यावर बदल करण्याचे अधिकारही जिल्हाधिकाऱ्यांना देऊन ही जागा मनपाला दिली आहे. मनपाला ही जागा नावावर करावी लागणार आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच दुसरीकडे मनपाने त्याचा डीपीआर तयार करण्यासाठी नियोजन करण्याचे काम सुरू केले आहे. त्यानुसार मनपाने डीपीआर तयार करण्याच्या कामात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांकडून अर्ज मागवले आहेत. ताबा मिळताच मनपा प्रशासनाने जागेचे सपाटीकरण करण्यास सुरुवात केली. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी आर्किटेक्ट, पीएमसी आदींना निमंत्रित करण्यात आले आहे. २२ डिसेंबरपर्यंत खासगी संस्थांनी यामध्ये भाग घ्यावा, असे आवाहन मनपाने केले आहे.

डीपी आर तयार करण्यापूर्वी घेणार बैठक : सपारीपार्कच्या डीपीआरसाठी मनपाने इरादापत्र मागवले असले तरी, अगोदर मनपा अधिकारी, पदाधिकारी शहरातील तज्ज्ञ मंडळींची बैठक बोलावून त्यांच्याकडून आलेल्या संकल्पनांची सूचना लक्षात घेऊन डीपीआर तयार करण्यात येणार आहे. यापूर्वीच असे आदेश मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरियांनी दिले आहेत.
एकूण२०० प्राणी : उद्यानातसध्या बेंगाल टायगर, पांढरे वाघ, बिबटे, हत्ती, हरिण, काळवीट आदी लहान-मोठे २०० प्राणी आहेत. सफारी पार्कमध्ये जिराफ आणि झेब्रा हे प्राणी नव्याने दाखल होणार आहेत. त्यासाठी डिसेंबरच्या अखेरीस मनपाचे पथक हैदराबाद येथे अभ्यास दौऱ्यासाठी जाणार आहे.
या बाबींचा अनुभव असणे आवश्यक
ज्याइच्छुक संस्थांना डीपीआर तयार करण्यात रस असणार आहे त्यांना मनोरंजन पार्क (अम्युजमेंट पार्क) तयार करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच प्राणिसंग्रहालय तयार करण्यासाठी आवश्यक बाबींचा आराखडा तयार करण्याचा अनुभव हवा. आवश्यक पाणठाणसाठी जागा विकसित करणे, इको टुरिझम प्रकल्प, नैसर्गिक बाबींशी संबंधित विशेष अनुभव असणाऱ्यांना यात सहभागी होता येईल.
बातम्या आणखी आहेत...