आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘साहस’ने बनवली आधुनिक ई-बाइक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - इंधन टंचाईवर मात करण्यासाठी आणि पर्यावरण र्‍हास थांबवण्यासाठी शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूलचा चौदावर्षीय साहस चितलांगे या विद्यार्थ्याने अँक्सिलरेटरवर चालणारी नव्या युगाची आधुनिक ई-बाइक बनवली आहे. 4 ते 5 तास चार्ज केल्यानंतर 15 ते 20 किलोमीटर चालते. दैनंदिन कामासाठी या बाइकचा वापर केला जाऊ शकतो.

पेट्रोलवर चालणार्‍या दुचाकी वायू आणि ध्वनिप्रदूषण करतात. कार्बन मोनॉक्साइडसारखा विषारी वायू सोडतात. साहसची ई-बाइक सुरू झाल्यावरही आवाज आणि वायुप्रदूषण करत नसल्याने बाइक प्रदूषण पर्यावरणाला पूरक असल्याचे साहसने सांगितले. याशिवाय बाइक कॉम्पॅक्ट असल्यामुळे ट्रॅफिक जामची समस्या येत नाही. कार्यालयात आणि दैनंदिन कामासाठी ही बाइक वापरू शकतो. बाइक बनवण्यासाठी साहसला त्याची आई प्रीती चितलांगे मामा आशिष दरगड यांनी सहकार्य केले.प्रदूषणरहित बाइक बनवल्याबद्दल चेतना फाउंडेशनने त्याचा सत्कार केला. तसेच पोदार इंटरनॅशनलचे डायरेक्टर आर.डी.पवार, प्राचार्य झीनत सय्यद,गीत सैनी यांनी अभिनंदन केले आहे.

अशी तयार झाली बाइक : सायकलला 12 व्होल्ट बॅटरी व 24 व्होल्ड डिसी मोटारचा वापर केला आहे. इलेक्ट्रिक सायकलमध्ये लाइट, हॉर्न, स्पीडोमीटर, बॅटरी हे फीचर बसवण्यात आले आहे. तसेच अँक्सिलरेटरवर चालण्यासाठी ट्रायल अँड एरर पद्धतीने कंट्रोलर डिझाइन केले आहे.


अशी चालते बाइक
बाइक चार्ज केल्यावर 15 ते 20 किलोमीटर चालते. एक वेळेस फूल चार्ज करण्यासाठी 4 ते 5 तास लागतो. एका युनिटपेक्षाही कमी वीज खर्च होते. साधारणत: 30 पैसे प्रतिकिलोमीटर इतक्या कमी खर्चात ही बाइक चालते. या बाइकचा वेग 25 किमी प्रतितास आहे. विशेष म्हणजे ही बाइक साहसने वापरलेल्या दुहेरी पुलीमुळे बॅटरी डिसचार्ज झाल्यानंतरही पॅडलवर चालू शकते.