आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साई अभियांत्रिकी मासकॉपी प्रकरण: दहा दिवस झाले तरी पोलिसांना परीक्षेची नियमावलीच समजेना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज्यभर गाजलेले साई अभियांत्रिकी महाविद्यालयातील मास कॉपी प्रकरण उघडकीस येऊन दहा दिवस उलटून गेले तरी पोलिस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून तपासाची दिशा स्पष्ट झालेली नाही. पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडे शनिवारी विचारणा केली असता त्यांनी आम्ही विद्यापीठाची नियमावली समजून घेत आहोत, असे उत्तर दिले.
 
विद्यापीठातर्फे नियुक्त विभागीय चौकशीचा अहवाल आम्हाला मार्गदर्शक ठरेल, असे ते म्हणाले. मात्र, या अहवालावर पूर्णपणे अवलंबून नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. साईचे २६ विद्यार्थी शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरात पेपर सोडवताना आढळले. तेथे आणखी २३ उत्तरपत्रिका सापडल्या होत्या. न्यायालयाने सुरेंसह सर्व विद्यार्थ्यांना जामीन मंजूर केला, तर प्राध्यापक संस्थाचालकांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दुसरीकडे पोलिस पथकाने विद्यापीठाच्या काही अधिकाऱ्यांची चौकशी केली. मात्र, त्यातून कुठलेही ठोस मुद्दे हाती लागले नाहीत. साईचे प्राध्यापक संस्थाचालक वगळता या घोटाळ्यात इतर कोण जबाबदार आहे, या दिशेने सुरू झालेला तपास थंडावला आहे. २३ उत्तरपत्रिका कोणाच्या हेही शोधले गेले नाही. 

हे प्रश्न अनुत्तरितच 
१. परीक्षा झाल्यानंतर किती वेळात उत्तरपत्रिका विद्यापीठात पोहोचणे आवश्यक आहे? 
२. या प्रकरणात अजून किती अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे? 
३. १६ मेच्या व्यतिरिक्त किती पेपर विद्यार्थ्यांनी सुरेंच्या घरी सोडवले?  

असा केला होता दावा, प्रत्यक्षात काय झाले! 
- पहिल्या दिवशीच्या कारवाईनंतर आणखी आरोपी गजाआड होतील. इतर महाविद्यालयांतील असे प्रकारही उघडकीस येतील, असे पोलिसांनी म्हटले होते. 

प्रत्यक्षातजैसे थे स्थिती आहे 
- विद्यापीठ परीक्षा विभागातील बडे अधिकारी अडकल्याचे सांगण्यात आले होते. 
- कुलगुरूंच्या सदिच्छा भेटीनंतर चौकशी नाही 
बातम्या आणखी आहेत...