आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘साई’प्रकरणी विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीचे कामकाज सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- साई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीतील प्रकरणाची पोलिसांमार्फत चौकशी करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठही तीन सदस्यीय समितीमार्फत स्वतंत्र चौकशी केली जात आहे. या समितीची दुसरी बैठक बुधवारी (२४ मे) दुपारी परीक्षा विभागात झाली. 

पोलिसांच्या तपासात मदत करणार असल्याची ग्वाही कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी स्वत: पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना भेटून दिली. त्याशिवाय विद्यापीठ आपल्या स्तरावरून सत्यशोधन समितीमार्फत चौकशी करणार असल्याचे कुलगुरूंनी जाहीर केले होते. भौतिकशास्त्र विभागातील प्रा. डॉ. एम. डी. शिरसाट यांच्या अध्यक्षतेत कुलगुरूंनी तीनसदस्यीय समितीची घोषणा केली होती. यात केमिकल टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख तथा प्रोफेसर डॉ. प्रवीण वक्ते, प्रोफेसर डॉ. साधना पांडे यांचा समावेश आहे.

समिती सदस्यांना मंगळवारी (२३ मे) सायंकाळी सहा वाजता पत्र दिले आहे. बुधवारपासून समितीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली असून १५ दिवसांत अहवाल देण्याचे ठरले आहे. डॉ. साधना पांडे सध्या सुटीवर असल्यामुळे त्या बैठकीत उपस्थित नव्हत्या. आता गुरुवारी सकाळी ११ वाजता पुन्हा परीक्षा विभागात बैठक होणार असल्याची माहिती आहे. 
बातम्या आणखी आहेत...