आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साई इंडस्ट्रीच्या गोडाऊनला भीषण आग, आगीत लाखो रुपयांचे नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- चिकलठाणा एमआयडीसीतील साई इंडस्ट्री या प्लास्टिकचे दाणे बनवणाऱ्या कंपनीला शुक्रवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. तब्बल नऊ तास ही आग धुमसत होती. आग विझविण्यासाठी सुमारे ५० बंब खासगी टँकर लागले. रात्री साडेदहापर्यंत आग विझली नव्हती.

नारेगाव परिसरात माणिकनगरजवळ साई इंडस्ट्री ही कंपनी आहे. शुक्रवार असल्यामुळे कंपनीला सुटी होती. त्यामुळे कामगार आलेले नव्हते. सकाळी ९.३० च्या सुमारास कंपनीच्या गोडाऊनमध्ये आगीचे लोळ दिसण्यास सुरुवात झाली. घाबरलेल्या नागरिकांनी तत्काळ ही माहिती एमआयडीसी सिडको पोलिस, अग्निशमन विभाग आणि महावितरणला कळवली. अवघ्या २० मिनिटांत अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी पोहोचले. आग अाटोक्यात आणली तरी धुराचे प्रचंड लोट निघतच होते. संध्याकाळी सात वाजेपर्यंत ५० पेक्षा अधिक बंब खासगी टँकर लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रात्री आठच्या सुमारास आगीने पुन्हा पेट घेतला होता. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक असल्यामुळे आग विझत नव्हती. शिवसेना उद्योग आघाडीचे प्रमुख बाळासाहेब सानप, ज्ञानेश्वर गंगाजी, गणेश माटेकर, कृष्णा मेटे, सोहेल बेग, विकास हिवराळे, जावेदभाई, शेखलाल शेख आदी नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

१६ वर्षांची मुलगी वाचली
आगलागली तेव्हा वॉचमनची १६ वर्षांची काजल पालुदे ही मुलगी पहिल्या मजल्यावर होती. आसपासच्या नागरिकांनी तिला वाचवले. ही कंपनी संजय मोरे यांची आहे. घटना कळल्यानंतर एका तासात ते कंपनीत पोहोचले. रात्रभर त्यांचे कुटुंब घटनास्थळी होते. खासदार चंद्रकांत खैरे यांनीदेखील घटनास्थळाला भेट दिली. एवढी मोठी आग लागूनही पोलिस इकडे फिरकले नाहीत.
रात्री दहा वाजेनंतरही गोडाऊनमधून धूर येत होता. छाया : रवी खंडाळकर
शुक्रवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास आग लागली.