आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saibaba Shirdi Saint Hindu Controvercy News In Marathi

जाणून घ्या, साईबाबांबद्दल सबकूछ, त्यांच्या नावापासून शिर्डीपर्यंतचा अलौकिक प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सौजन्य- मराठी विश्वकोश)
औरंगाबाद- साईबाबा हिंदू संत आहेत, की नाही यावर सध्या बराच वाद सुरू आहे. छत्तीसगडमधील कवर्धा येथे झालेल्या धर्मसंसदेत साईबाबा हिंदू संत नसल्याचा सूर निघाला. त्यानंतर आपली बाजू मांडायला मंचावर गेलेल्या साईभक्ताला धक्काबुक्की करण्यात आली. यानंतर या वादाला उग्र स्वरुप प्राप्त झाले. साईबाबा संत आहेत, की नाही हे ठरवण्याचा अधिकार भक्तांना आहे. पण मुळात साईबाबा कुठून आले, त्यांचे हे नाव कसे पडले, लोकांच्या मनात त्यांनी कशी जागा केली आदी माहिती जाणून घेणे फारच रंजक आहे.
साईबाबा : (१८५६–१५ ऑक्टोबर १९१८). महाराष्ट्रातील एक सत्पुरुष. त्यांच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. ते इ. स. १८७२ मध्ये एका लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर शिर्डीला (जिल्हा अहमदनगर) आले. त्यावेळी त्यांचे वय सोळा असावे.
या वऱ्हाडाचा मुक्काम गावाबाहेरील खंडोबा मंदिराजवळ होता. शिर्डीतील म्हाळसापतिनामक एक सुवर्णकार दररोज खंडोबाच्या दर्शनास येत असत. एक दिवशी त्यांनी या तरुण मुलास पाहिले आणि त्याला एकदम ‘आवो साई’ अशी प्रेमाने हाक मारली आणि तेव्हापासून ‘साईबाबा’ हे त्यांचे नाव रूढ झाले. साईबाबा अखेरपर्यंत शिर्डीत राहिले. म्हाळसापती हे पुढे त्यांचे निस्सीम भक्त बनले. साईबाबांच्या आध्यात्मिक अधिकाराचा आणि सामर्थ्याचा प्रत्यय अनेकांना येऊ लागल्यानंतर एक थोर सत्पुरुष म्हणून त्यांचे नाव शिर्डी गावाच्या सीमांपलीकडे दूरवर पोहोचले आणि शिर्डीला एका पवित्र स्थळाचे माहात्म्य प्राप्त झाले.
पुढील स्लाईडवर वाचा साईबाबांची धर्म कोणता....
(फोटो सौजन्य-गुगल)