आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेकमेट करीत साक्षीने लुटले रौप्यपदक, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वास्कादुवा श्रीलंका येथे झालेल्या ‘कॉमनवेल्थ चेस चॅम्पियनशिप २०१६’ या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मास्टर साक्षी दिनेश चितलांगे हिने रौप्यपदक पटकावले. तिने पैकी गुणांची कमाई केली. विशेष म्हणजे १६ वर्षांच्या साक्षीने २० वर्षांखालील ज्युनियर मुलींच्या गटात ही कामगिरी साधली. या स्पर्धेत तिने एकूण ५८ आंतरराष्ट्रीय गुणांची कमाई केल्याने तिचे आंतरराष्ट्रीय रेटिंग २०७३ होईल. या स्पर्धेत १० देशांतील १८५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत ग्रँडमास्टर, आंतरराष्ट्रीय मास्टर, महिला ग्रँडमास्टर, महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आणि २१ फिडे मास्टर्सच्या सहभागामुळे चुरस निर्माण झाली होती.
साक्षी ने मालदीवच्या मोहंमद नूर, श्रीलंकेची पेविन्या पी, दिल्हारा इशिनी, मलेशियाच्या ली झी वी आणि भारताच्या बारत कल्याण यांचा शानदार डाव खेळत पराभव केला. वुमन ग्रँडमास्टर मोहोता निशा आणि आकांक्षा हगवणे यांच्यासोबत प्यादा जास्त असतानाही बरोबरीत समाधान मानावे लागले. तिला ग्रँडमास्टर अंकित राजपारा आणि कॅनडाचा फिडे मास्टर शियम थवनदिरन यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. तिच्या या यशाबद्दल भारतीय संघाचे प्रमुख महापात्रा, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, संघटनेचे अध्यक्ष आमदार अतुल सावे, सचिव हेमेंद्र पटेल, दिनेश चितलांगे यांनी अभिनंदन केले.

साक्षीची आतापर्यंतची कामगिरी
गतवर्षी कॉमनवेल्थ चेस चॅम्पियनशिप २०१५ मध्ये सबज्युनियर महिला गटात रौप्यपदक जिंकले होते. आशियन १८ वर्षे मुलींच्या चेस चॅम्पियनशिप २०१५ मध्ये सुवर्णपदक मिळवले. वर्ल्ड वुमन अमॅच्युअर चेस चॅम्पियनशिप २०१४ मध्ये सुवर्णपदकासह वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा बहुमान मिळवला. सलग आंतरराष्ट्रीय स्पर्धेत साक्षीने सुवर्णपदके आणि रौप्यपदके मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...