आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sale Tax Department Revenue 540 Crores Rupee Cut

विक्रीकर विभागाचा महसूल ५४० कोटी रुपयांनी घटला, दुष्काळाचा फटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यातील भीषण दुष्काळाचे गंभीर परिणाम आता पुढे येऊ लागले आहेत. दुष्काळाचा विक्रीकर विभागाला मोठा फटका बसला अाहे. उद्दिष्टापेक्षा महसूल वसुली केवळ ८२ टक्के झाली असून ५४० कोटींचा फटका बसला आहे. औरंगाबाद विक्रीकर विभागाला २०१५-१६ या वर्षात हजार ४१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. पैकी यंदा हजार ५०१ कोटींचा महसूल जमा करण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे गेल्या आर्थिक वर्षात (२०१४-१५) २७११ कोटी ४४ लाख रुपयांचा महसूल जमा झाला होता.

औरंगाबाद विक्रीकर विभागात औरंगाबाद, जालना आणि बीड हे तीन जिल्हे येतात. या विभागा अंतर्गत मूल्यवर्धित कर, व्यवसाय कर, बॉम्बे सेल्स टॅक्स, ऊस खरेदी करासह विविध करांची वसुली करण्यात येते. विक्रीकर सहआयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले की, विक्रीकर विभागाला औरंगाबाद जिल्ह्यातून सर्वाधिक महसूल मिळाला आहे. जिल्ह्यातून २६६९ कोटींचे उद्दिष्ट असताना २,२१० कोटींचाच महसूल प्राप्त झाला आहे. जालना जिल्ह्यातून २४२ कोटी ७३ लाख रुपये महसूल अपेक्षित असताना केवळ २०१ कोटी रुपये, तर बीड जिल्ह्यातून १२९ कोटी लाख रुपयांचे उद्दिष्ट असताना ८९ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. आगामी वर्षात २८९० कोटी रुपयांचे उद्दिष्ट विक्रीकर विभागाला देण्यात आले आहे.

ऑटोमोबाइल सेक्टर बाधित : दुष्काळाचा ऑटोमोबाइल सेक्टरवर परिणाम झाला आहे. एकट्या स्कोडाकडून व्हॅटच्या माध्यमातून मिळणारा व्हॅट २५३ कोटींनी कमी झाला आहे. गेल्या वर्षी स्कोडाकडून ४६० कोटी ६० लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. या वर्षी २०६ कोटी ६५ लाखांचा महसूल मिळाला आहे. स्कोडाकडून यापूर्वी साडेबारा टक्के कर मिळत होता. मात्र, आंतरराज्य विक्री जास्त झाल्यामुळे केवळ २.५ टक्केच कर मिळत आहे.
स्टीलउद्योगातील मंदीचाही फटका : यावर्षी जालना येथील स्टील उद्योगातील मंदीचाही विक्री कराला मोठा फटका बसला आहे. जालन्यामध्ये स्टील युनिट आहेत. त्यापैकी २२ कंपन्या बंद, तर १५ कंपन्यांकडून केवळ एकाच पाळीत काम सुरू आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी ७६ कोटी २५ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. या वर्षी केवळ ५४ कोटी ५६ लाख रुपये महसूल प्राप्त झाला आहे.

आगामी उद्दिष्ट पूर्ण करू
यावर्षी दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अपेक्षित उद्दिष्ट साध्य झाले नाही. एकट्या स्कोडाकडून मिळणाऱ्या २५३ कोटींच्या महसुलातही घट आली आहे. त्यामुळे आम्ही ८२ टक्केच उद्दिष्ट प्राप्त करू शकलो. गेल्या वर्षीच्या तुलनेत २१० कोटींनी महसूल घटला आहे. आगामी काळात २८१० कोटींचे उद्दिष्ट मिळाले असून ते पूर्ण करण्यात येईल. डी. एम. मुगळीकर, विक्रीकर सहआयुक्त