आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतर रद्द : मनपा आयुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - योजनेचा ठेका रद्द झाला म्हणजे योजनाच रद्द होते, असे खळबळजनक वक्तव्य महापालिका आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी शुक्रवारी केले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधळानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

केंद्र, राज्य शासन आणि मनपातर्फे समांतर योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी ठेकेदाराला वेळेत काम सुरू करण्याच्या सूचनाही वेळोवेळी केल्या. मात्र, त्यांनी वेळेत काम सुरू केले नाही. त्यामुळे त्यांना एक महिन्याची अंतिम नोटीस दिली आहे.

विधिमंडळातही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तेच सांगितले आहे. त्यानुसार ठेकेदाराकडे काम सुरू करण्यास आणखी 18 दिवस वेळ आहे. त्यानंतर राज्य शासनाच्या सूचनांनुसार योजनेची नव्याने आखणी करावी लागणार असल्याचेही डॉ. कांबळे म्हणाले; पण जर एखाद्या योजनेचा ठेका रद्द झाला तर ती योजनाच रद्द होत असल्याचे आयुक्तांनी सांगितल्यामुळे या विषयावर चर्र्चांना आणखी उधाण आले आहे.