आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतरप्रकरणी शिवसेनेसोबत भाजपचे आस्ते कदम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- समांतरजलवाहिनीत डीआय पाइपऐवजी एचडीपी पाइप वापरण्यासाठी पालिकेने घेतलेला ठराव राज्य शासनाने खंडित केला आहे. विशेष म्हणजे यासाठी बोलावलेल्या बैठकीपूर्वीच हा निर्णय घेण्यात आला. यामागचे कारण शोधले असता शिवसेनेशी पंगा घेणे बरोबर नाही, त्यामुळे मंत्र्यांनी आदेश देण्यापेक्षा तांत्रिक कारण पुढे करण्याचे ठरले होते, असे उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले.
गेल्या महिन्यात सर्वसाधारण सभेत एचडीपी पाइप वापरण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे पालिकेचे दीडशेपेक्षा जास्त कोटी रुपयांचा फायदा होणार असल्याचा दावाही करण्यात आला होता. या प्रस्तावाला प्रारंभीपासूनच भाजपने जोरदार विरोध चालवला होता. मात्र सर्वसाधारण सभेत महापौर त्र्यंबक तुपे यांनी मित्रपक्षाचा विरोध डावलून हा प्रस्ताव मंजूर केला. त्यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांनी आदेश दिल्याची चर्चा होती .
भाजपचा विरोध असल्याने मुख्यमंत्र्यांकरवी हा प्रस्ताव विखंडित केला जाईल, अशी चर्चा होती. तसे प्रयत्न भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चालवले होते. त्यासाठी मंत्र्यांकडे बैठक बोलावण्याचे ठरले होते. ही बैठक मागील आठवड्यातच होणार होती. परंतु मुख्यमंत्री विदेश दौऱ्यावर गेल्याचे कारण सांगून ती रद्द करण्यात आली. ती बैठक आता बुधवारी होण्याचे ठरले होते. परंतु त्याआधीच म्हणजे मंगळवारी सायंकाळी या विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत डीआय पाइपच वापरा असा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर पालिकेचा प्रस्ताव विखंडित करण्याचेही ठरले.

एकदिवस आधी का झाला निर्णय?
सूत्रांनीदिलेल्या माहितीनुसार भाजप मंत्र्यांच्या बैठकीत पालिकेचा प्रस्ताव विखंडित करण्याचा निर्णय झाला तर युतीत वेगळा संकेत जाईल. त्याचबरोबर पुन्हा वाद वाढतील, अशी भीती भाजपलाही होती. त्यामुळे तांत्रिक कारणावरून हा प्रस्ताव प्रशासकीय स्तरावरच निपटावा असे ठरले. सचिवांनी निर्णय घेतला असला तरी त्यामागे भाजपच आहे, यात वाद नसला तरी निर्णय आम्ही घेतला नाही, असे सांगता यावे, म्हणून भाजपने चालाखीने सचिवांना पुढे केल्याचे समजते.

भाजपचा असाही युक्तिवाद
सर्वसाधारणसभेत हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर भाजपच्या वतीने मुख्यमंत्री तसेच नगरविकास खात्याच्या राज्यमंत्र्यांना दोन वेगवेगळी पत्रे देण्यात आली. मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आलेले पत्र त्यांनी सचिवांकडे पाठवले. त्यावरून बैठक लावण्यात आली. त्यात त्यांनी हा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या पत्रावर राज्यमंत्र्यांनी लावलेली बैठक बुधवारी मुंबईत होती. त्यामुळे हा निर्णय मंत्र्यांनी नव्हे तर अधिकाऱ्यांनी घेतल्याचे दाखवणे भाजपला सोपे गेले. मुख्यमंत्र्यांसमोर होणारी याच विषयावरील बैठख मात्र रद्द करण्यात आली. ती आता होणार नसल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे.

खैरेंच्या नाराजीला घाबरले स्थानिक
हाप्रस्ताव रद्द केला तर शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे हे नाराज होतील आणि त्यांना तोंड देता-देता नाकीनऊ येतील म्हणून भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रस्ताव रद्द झाला पाहिजे पण खैरेंची नाराजी नको, असे मंत्र्यांसमोर सांगितल्याचे समजते. या प्रस्तावात खैरे यांचा संबंध नाही, रामदास कदम यांनी यात लक्ष घातले होते. त्यावरून वेगळी चर्चा सुरू आहे.
समांतरप्रकरणी शिवसेनेसोबत भाजपचे आस्ते कदम