आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतर प्रकल्पाच्या कंपनीवर मनपाचा 1600 कोटींचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समांतर जलवाहिनी प्रकल्पाचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी आणि महानगरपालिकेचा वाद सध्या लवादासमोर सुरू आहे. यात कंपनीने मनपावर ८५६ कोटी रुपयांचा दावा केला होता. त्याला उत्तर म्हणून दोन दिवसांपूर्वी मनपाने कंपनीवर थेट १६०० कोटी रुपयांचा दावा मुंबईत लवादाच्या प्रमुखांसमोर दाखल केला आहे.

मनपाने कंपनीसोबतचा करार रद्द केल्यानंतर कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने जैसे थे काम ठेवण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार मनपाने आदेशानुसार पाणीपुरवठा योजनेवर ताबा घेऊन पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू करून एक वर्ष पूर्ण झाले आहे. दरम्यान, लवादाची स्थापना करण्यात आला. यात तीन सुनावण्या औरंगाबादमध्ये घेण्यात आल्या. त्यात कंपनीने मनपावर अगोदर नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. त्यानंतर मनपाला आपला दावा आणि आपले म्हणणे स्पष्ट करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी दिला होता.
 
योजना पूर्ण करण्यासाठी एक हजार कोटी लागणार
शासनाकडून आलेला १६१ कोटी रुपयांचा निधी मनपाला मिळाला. निधी असूनही सिटी वॉटर युटिलिटीने केवळ ५.५ टक्केच काम केलेे. त्यामुळे मनपाने कंपनीवर १०५० कोटींचा दावा केला. झालेला विलंब नागरिकांना बसणारा भुर्दंड उर्वरित कामासाठी कोणताच निधी अथवा हप्ता येणार नसल्याने याच्या खर्चासाठीही ५५० कोटींचा दावा केला.
बातम्या आणखी आहेत...